महेश मांजरेकर यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 20:53 IST2022-02-23T20:52:21+5:302022-02-23T20:53:18+5:30

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

A case has been registered against Mahesh Manjrekar at Mahim police station | महेश मांजरेकर यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्या विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईच्या माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता महेश मांजरेकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

वृत्तसंस्था एएनआयनं यासंदर्भात ट्वीट करून ‘माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पोस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत असं नमूद केलं आहे. 

 

Web Title: A case has been registered against Mahesh Manjrekar at Mahim police station