गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 23:05 IST2022-01-27T23:05:15+5:302022-01-27T23:05:57+5:30
Girish Mahajan :

गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जामनेर जि.जळगाव : जामनेर येथे भाजपतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, विधानसभा प्रमुख तुकाराम निकम, गोविंद अग्रवाल, बाबुराव घोंगडे, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, नामदेव मंगरुळे, अनीस शेख बिस्मील्ला, नाजीम शेख वजीर, महेंद्र बाविस्कर आणि रवींद्र झाल्टे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.