शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

चष्म्यावरून ५ महिन्यानंतर पटली मृतदेहाची ओळख, पुरावे नष्ट करण्यासाठी १०० वेळा पाहिला टीव्हीवरील क्राईम शो 

By पूनम अपराज | Published: October 29, 2020 9:58 PM

Murder : पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १०० हून अधिक वेळा पाहिला होता असल्याचे आढळले. हत्येच्या घटनेच्या ५ महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक करण्यात आली.

ठळक मुद्देमृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे नाव मनोज मिश्रा (४२) असे आहे. ११ वर्षीय संगीत यांच्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका १७ वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या आईसोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. हे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोल या शोमधून काही युक्त्या मिळवल्या. पोलिसांनी त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्याने टीव्ही शो क्राईम पेट्रोल १०० हून अधिक वेळा पाहिला होता असल्याचे आढळले. हत्येच्या घटनेच्या ५ महिन्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात तर आईला अटक करण्यात आली.

मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे नाव मनोज मिश्रा (४२) असे आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुलगा १२ वीचा विद्यार्थी आहे. अल्पवयीन मुलाने हे दुष्कृत्य २ मे रोजी केले होते. वडील त्याला ओरडले म्हणून त्याने आपल्या वडिलांच्या डोक्यावर लोखंडाच्या सळईने घाव घातला. त्यानंतर वडील बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. त्याच रात्री या मुलाने आपल्या आईच्या मदतीने मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न केला.तो मृतदेह घेऊन घरापासून साधारण ५ किमी दूर एका जंगलात गेला. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने पेट्रोल आणि टॉयलेट क्लीनरने मृतदेह जाळून टाकला. पोलिसांना ३ मेला अंशत: जळालेला मृतदेह आढळला. तीन आठवड्यांपर्यंत या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नव्हती. कारण कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही व्यक्तीची हरवले असल्याची तक्रार दाखल नव्हती झालेली. मृत व्यक्तीच्या कुटुंबाने इस्कॉनच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन २७ मेला एक हरवल्याची तक्रार दाखल केली. कारण मनोज मिश्रा हे इस्कॉनमध्ये डोनेशन कलेक्टर म्हणून तेथे काम करत होते. येथील काही सहकाऱ्यांनी मनोज मिश्रा यांच्या मृतदेहाची चष्म्यावरून ओळख पटवली. इस्कॉनमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, मनोज दीर्घकाळापासून गैरहजर होते. मात्र ते अनेकदा भगवत गीतेचा प्रचार करण्यासाठी यात्रा करत असत त्यामुळे याबाबत कोणताच संशय आला नाही. पोलिसांनी जेव्हा मनोजच्या मुलाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तो बचावाचा प्रयत्न करू लागला. त्याचप्रमाणे पोलिसांना प्रश्न करू लागला ते का व कोणत्या अधिकाराने त्याची चौकशी करत आहेत. दरम्यान जेव्हा त्याचा मोबाईलची तपासणी केली गेली तेव्हा पोलिसांना कळले त्याने क्राईम पेट्रोल ही सीरिज १००हून अधिक वेळा पाहिली. अनेकदा चौकशी केल्यानंतर अखेर त्याने आपली चूक कबूल केली. पोलिसांनी या प्रकरणी ३९ वर्षीय संगीता नावाच्या आईलाही अटक केली आहे. तिच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ११ वर्षीय संगीत यांच्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकCrime patrol Showक्राइम पेट्रोलCrime Newsगुन्हेगारी