शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:24 IST

आईसाठी आपलं मूल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मात्र, आता एका आईनेच आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आईसाठी आपलं मूल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टींच्या आधी आई नेहमी आपल्या मुलांना प्राधान्य देते. मात्र, आता एका आईनेच आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ लाखांचा विमा आणि अनैतिक संबंध या क्रूर घटनेला कारणीभूत ठरले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेत आईने आपल्या तरुण मुलाचा खूनच केला नाही तर, त्याचा मृतदेह हायवेवर नेऊन रस्त्यावर फेकला. पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू करताच हे धक्कादायक सत्य समोर आले.

कानपूर देहात येथील अंगदपूर बरौर गावात ही  धक्कादायक घटना घडली. गावातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय प्रदीप शर्माचा मृतदेह २७ ऑक्टोबर रोजी औरैया-कानपूर महामार्गाच्या बाजूला संशयास्पद परिस्थितीत आढळला. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघाताचा वाटत होता, परंतु शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर पोलिसांना तरुणाची हत्या झाल्याचा संशय आला.

प्रियकर मनीषवर अपहरण आणि हत्येचा आरोप

पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा धक्कादायक खुलासे झाले. प्रदीपचे आजोबा जगदीश नारायण यांनी ऋषी कटियार उर्फ ​​रेशु आणि त्याचा भाऊ मयंक उर्फ ​​मनीष यांच्यावर अपहरण आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. मंगळवारी रात्री निगोही येथील दुर्वासा आश्रमाजवळ पोलिसांचा दोन्ही आरोपींशी सामना झाला, ज्यामध्ये ऋषीच्या पायाला गोळी लागली आणि दोन्ही भावांना अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान त्यांनी सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झाले. त्यांनी चौकशीत उघड केले की, प्रदीपच्या आईचे मनीषशी अनैतिक संबंध होते. प्रदीपला त्यांच्या या नात्याबद्दल कळले होते. त्याचा या नात्याला विरोध होता. यामुळेच त्याच्या आईचा राग अनावर झाला. दरम्यान, प्रदीपच्या नावावर १८ लाख रुपयांच्या तीन विमा पॉलिसी होत्या. विम्याच्या पैशाच्या लोभाने आणि प्रियकराच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या आईने प्रियकर मनीषसोबत मिळून स्वतःच्या मुलाला संपवण्याचा कट रचला.

तरुणाची गळा दाबून हत्या

२७ ऑक्टोबर रोजी, दोन्ही भाऊ प्रदीपला त्यांच्या कारमधून मुंगीसापूरला घेऊन गेले. वाटेत त्यांनी त्याचा गळा दाबून खून केला आणि अपघात झाल्याचे भासवण्यासाठी त्याचा मृतदेह औरैया-कानपूर महामार्गावर फेकून दिला. त्यानंतर ते पळून गेले. एएसपी राजेश पांडे यांनी सांगितले की, ऋषी कटियारवर झाशी आणि बरौरमध्ये आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. तो एक कुख्यात गुन्हेगार आहे. या प्रकरणाच्या तपासात प्रदीपच्या आईची भूमिका देखील उघड झाली आहे, त्यामुळे लवकरच तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother Kills Son for Insurance Money and Affair: Shocking Crime

Web Summary : A mother in Kanpur, driven by greed for insurance money and an affair, murdered her 23-year-old son with her lover's help. They dumped the body on a highway to fake an accident. Police investigation revealed the horrific truth.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश