शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला नडला दुचाकीचोरीचा छंद, १९ वर्षीय आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 01:42 IST

Crime News : वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांत दररोज दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येऊन गुन्हे दाखल होत होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.

नालासोपारा - विरारमध्ये राहणाऱ्या १९ वर्षीय आरोपी तरुणाला दुचाकी चालवण्याचा छंद अखेर नडला. त्याने चोरी केलेल्या दहा दुचाकी वसईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वसई तालुक्यातील पाच पोलीस ठाण्यांतर्गत लॉकडाऊनच्या काळात त्याने दुचाकी चोरल्याचे गुन्हे दाखल आहे.वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांत दररोज दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येऊन गुन्हे दाखल होत होते. पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि वसई परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय पाटील यांनी दुचाकी चोरी झाल्याचे गुन्हे उघड करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. वसईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांना दुचाकी चोरणाऱ्याबद्दल माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचारी सदर आरोपीवर पाळत ठेवून होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने  रेल्वे स्थानकांबाहेरील दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अमन रमजान शेख (१९) असे आरोपीचे नाव आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी सांगितले की, आरोपी हा एकटाच चोरी करायचा. आतापर्यंत १० दुचाकी मिळाल्या असून अजूनही मिळतील. आरोपीची आई जोगेश्वरी येथे राहत असून ती मध्यंतरी आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिला भेटण्यासाठी आणि नशा करण्यासाठी हा दुचाकी चोरी करायचा. मुंबईला जाताना हा कोणती तरी दुचाकी चोरी करून घेऊन जायचा आणि तिचे पेट्रोल संपले की ती दुचाकी रस्त्यात सोडून दुसरी दुचाकी चोरी करून पुढे जायचा. गाड्या विकण्याचा त्याचा धंदा नव्हता. घाटकोपरच्या जेलमधून लॉकडाऊनच्या काळात सुटला होता. तो विरारला पत्नीसह राहतो. त्याच्यावर नालासोपारा, अर्नाळा, नवघर, विरार, तुळिंज या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार