13 वर्षाच्या मुलाने टॉयलेटमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीची केली हत्या, वडिलांच्या अपमानाचा बदला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 21:07 IST2022-05-15T21:01:34+5:302022-05-15T21:07:34+5:30
Murder Case : सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

13 वर्षाच्या मुलाने टॉयलेटमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीची केली हत्या, वडिलांच्या अपमानाचा बदला
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १३ वर्षीय मुलाने एक वर्षाच्या चिमुकलीची हत्या केली आहे. ही घटना लखनौच्या सैरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यानंतर या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीया मुलाला आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्याने मुलीची हत्या केली. तिला शाळेतील पाण्याच्या टाकीत टाकले. इतकेच नव्हे तर मुलीचा मृतदेह वर येऊ नये म्हणून आरोपी मुलाने तिच्या पायाला वीट बांधली होती.
सैरपूर पोलीस ठाणे हद्दीतील जुगौर गावात सुशील पांडे यांची १ वर्षाची मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर सुशील यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीस तपासादरम्यान २ अल्पवयीन मुले चिमुकलीला शाळेच्या दिशेने घेऊन गेल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी शाळेत झडती घेतली असता शौचालयातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह पडलेला आढळला. मुलीचा पाय विटेने बांधलेला होता, तर तिच्या अंगावर कपडे नव्हते. नंतर पोलिसांनी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढला. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवला आणि संपूर्ण प्रकरणाचा तासभर तपास केल्यानंतर या प्रकरणाचा खळबळजनक खुलासा झाला. त्यावेळी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने या निष्पाप मुलीची हत्या केल्याचं उघड झालं.
तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला, बळजबरीने लग्न केले, मग क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त एस. चिनप्पा यांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करणारा अल्पवयीन मुलगा ड्रग्जच्या आहारी गेलेला असून तो अनेकदा लोकांना त्रास देत असतो. त्याच्या कुटुंबीयांकडेही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलाने चिमुकलीची हत्या केली. सध्या त्याची चौकशी सुरू असून लवकरच त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.