तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला, बळजबरीने लग्न केले, मग क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 09:43 PM2022-05-13T21:43:37+5:302022-05-13T21:44:11+5:30

Rape Case : तेथे मित्राच्या खोलीत नेऊन अत्याचार केला. यादरम्यान एक अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. याबाबत धमकावून अनेकवेळा अत्याचार केले. पीडितेने कोटा येथे जाऊन कोचिंग सुरू केले. तेथेही आरोपी धमकावून अत्याचार करायचे.

Rape of young woman many times, forced marriage, then crossing all limits of cruelty | तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला, बळजबरीने लग्न केले, मग क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

तरुणीवर अनेकवेळा बलात्कार केला, बळजबरीने लग्न केले, मग क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

googlenewsNext

बारां : पीडितेच्या तक्रारीवरून बारां येथील महिला पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, ओलीस ठेवणे, जबरदस्ती विवाह, कलम ३७६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

महिला पोलिस ठाण्याचे सीआय लच्छिराम यांनी सांगितले की, पीडितेने बारां येथे स्पर्धेच्या तयारीदरम्यान खासगी संस्थेचे शिक्षक शाहिद हुसेन तिला पेपर घेण्यासाठी अकलेरा येथे घेऊन गेले होते, असे तक्रारीत नमूद आहे. तेथे मित्राच्या खोलीत नेऊन अत्याचार केला. यादरम्यान एक अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. याबाबत धमकावून अनेकवेळा अत्याचार केले. पीडितेने कोटा येथे जाऊन कोचिंग सुरू केले. तेथेही आरोपी धमकावून अत्याचार करायचे.

यादरम्यान आरोपीने पीडितेला धमकावून जबरदस्तीने लग्न केले. काही महिन्यांपूर्वी आरोपीने पीडितेला बारांच्या घरी आणले. जिथे आरोपीच्या कुटुंबीयांनी पीडितेला धमकावले आणि खोलीत कोंडून ठेवले. पीडित तरुणी आरोपींच्या तावडीतून निसटली. याबाबत नातेवाईकांना माहिती दिली. पोलिसांनी शाहिद हुसेनसह १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

१९ जणांवर गुन्हा दाखल
कल्याण माल मीना, पोलीस अधीक्षक, बारां यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पीडितेच्या हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

 

 

 

Web Title: Rape of young woman many times, forced marriage, then crossing all limits of cruelty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.