मोबाईलसाठी १२ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास लावून; कुटुंबाला बसला हादरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:02 PM2021-12-23T22:02:45+5:302021-12-23T22:03:11+5:30

Suicide Case : ही घटना छिंदवाडा जिल्ह्यातील कोहका गावात बुधवारी दुपारी घडली आहे. येथे १२ वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसह मोबाइल पाहत होता. त्याची बहिण मोबाइलवर गेम खेळत होती.

12-year-old boy strangled for mobile; The family was shocked | मोबाईलसाठी १२ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास लावून; कुटुंबाला बसला हादरा 

मोबाईलसाठी १२ वर्षाच्या मुलाने घेतला गळफास लावून; कुटुंबाला बसला हादरा 

Next

मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १२ वर्षाच्या मुलाला मोबाइल न दिल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा आपल्या बहिणीकडून फोन मागत होता, गेम खेळत असल्याने बहिणीने फोन देण्यास नकार दिला, नंतर रागाच्या भरात मुलाने टोकाचं पाऊल उचललं आणि गळफास लावून घेतला. 

ही घटना छिंदवाडा जिल्ह्यातील कोहका गावात बुधवारी दुपारी घडली आहे. येथे १२ वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसह मोबाइल पाहत होता. त्याची बहिण मोबाइलवर गेम खेळत होती. यादरम्यान भावाने बहिणीकडे मोबाइल मागितला. मात्र तिने देण्यास नकार दिला. म्हणून रागाच्या भरात तो एका खोलीत गेला आणि दार लावून गळफास घेत आत्महत्या केली.

१३ वर्षाच्या मुलाने ३५ वर्षीय महिलेवर केला बलात्कार; कुत्र्यामुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात

कुटुंबातील सदस्यांनी काही वेळानंतर दार ठोठावलं, त्यावेळी मुलाचा आवाज ऐकू येईना. बराच वेळ आई- वडील आवाज देत होते. मात्र तरीही काहीच मुलाने आवाज दिला  नाही. शेवटी दार तोडून आत गेल्यानंतर मुलाला लटकलेल्या अवस्थेत पाहताच वडिलांना जबर धक्का बसला. मुलाने गळफास लावून घेतला होता. यानंतर त्याला खाली उतरवण्यात आलं आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित केलं. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. आई-वडिलांची रडून वाईट अवस्था झाली आहे. दुसरीकडे बहिणीच्या डोळ्यातील अश्रू देखील थांबत नव्हते.

Web Title: 12-year-old boy strangled for mobile; The family was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.