अभ्यासावरून आई ओरडल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:38 IST2021-07-09T13:38:01+5:302021-07-09T13:38:48+5:30
Suicide Case : सोमवारी सायंकाळी त्याच्या आईने त्याला अभ्यासाला बसण्यासाठी सांगितलं.

अभ्यासावरून आई ओरडल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
अभ्यास न केल्याने आई ओरड्यामुळे एका १२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना वसईत घडली आहे. वसईतील समर्थ रामदास नगर इथली ही घटना आहे. मृत मुलाचं नाव शुभम शिवप्रसाद मंडल असं आहे. शुभम आपल्या आई वडीलांसोबत इस्ट व्ह्यू नावाच्या सोसायटीत राहतो. तो पाचव्या इयत्तेत शिकत होता.
सोमवारी सायंकाळी त्याच्या आईने त्याला अभ्यासाला बसण्यासाठी सांगितलं. मात्र त्याने आईचे ऐकले नाही. त्यामुळे आई शुभमवर ओरडली. आईकडून ओरडा खाल्ल्याने रागाच्या भरात बेडरूममधील पंख्याला गळफास लावून शुभमने आत्महत्या केली. बराच वेळ दार ठोठावून देखील बेडरूमचा दरवाजा न उघडल्याने त्याचे आई वडील घाबरले. त्यांनी तो दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना शुभमचा मृतदेह पंख्याला लटकलेलया अवस्थेत आढळला.
शुभमने आत्महत्या केल्याचं कळताच त्याच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला. शुभम त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पोलिसांनी शुभमचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.