शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

अरे देवा! कॉन्स्टेबलची परीक्षा फेल झाला तर फेक IPS बनला, ४ वर्ष लोकांना लुटत राहिला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 2:53 PM

Fake IPS caught in Rajasthan : गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता.

राजस्थानच्या (Rajasthan) पाली जिल्ह्यात एका फेक आयपीएसचा(Fake IPS) भांडाफोड झाला. केवळ १०वी शिकलेला हा तरूण चार वर्षापासून फेक आयपीएस बनून लोकांची फसवणूक (Fraud) करत होता. तेही आयपीएस अधिकाऱ्याचा पोशाख घालून. पोशाखावर आयपीएसचे बॅचेज, अशोक स्तंभ, स्टार लागलेले होते. सोबतच फेक आयडी कार्ड, फेक एअरगन आणि वॉकी-टॉकी. तसेच २०१५ मध्ये कॉन्स्टेबल परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नव्हता. तेव्हापासून तो फेक आयपीएस बनून लोकांची फसवणूक करत आहे.

गुरूवारी रात्री पाली जिल्ह्याच्या नव्या बस स्टॅंडवर पकडला गेलेला आरोपी स्वत:ला सीबीआयचा एसपी सांगत ट्रॅव्हल एजंटवर दबाव टाकत होता. जेणेकरून एसी बसमधून त्याला फ्रीमध्ये मुंबईला जाता यावं. ट्रॅव्हल एजंटच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी फुसारामला अटक केली. 

त्याच्या आयडी कार्यवर राजवीर शर्मा ऊर्फ रामप्रसाद शर्मा लिहिलं होतं. आरोपी फुसाराम पाली जिल्ह्यातील सर्वोदय नगरचा राहणारा आहे. जिल्ह्याचे एसपी कालूराम रावत यांनी सांगितले की, नवीन बस स्टॅंड चौकीचे प्रभारी ओमप्रकाश चौधरी आणि त्यांची टीम आरोपीला बघून हैराण झाली होती. कारण तो तंतोतंत आयपीएससारखा दिसत होता.

जेव्हा आरोपी फुसारामला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याने सगळं सत्य सांगितलं. त्यानंतर आरोपीला कोर्टात सादर करण्यात आलं.  तेथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. आरोपीची वर्दी, त्यावरील बॅच, अशोक स्तंभ, स्टार, फेक आयडी, फेक एअरगन इतर वस्तू ताब्यात घेण्यात आल्या.

असे सांगितले जात आहे की, याच आरोपीने ४ वर्षापूर्वी पालीच्या वीडी नगरमध्ये एका तरूणीला तो आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्याला पकडलं होतं. पण त्यावेळी वर्दीत नसल्याने त्याला केवळ इशारा देऊन सोडण्यात आलं होतं. 

जेव्हा पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी काढली तर समजले की त्याचा परिवार मुळचा रेण नागौरचा राहणारा आहे. त्याचे वडील होमगार्ड सर्विसमध्ये असल्याने परिवार पालीमध्ये येऊन वसला होता. आरोपी फुसारामच्या कारनाम्यांनी त्याची पत्नीही त्रासली होती. ती त्याला सोडून गेली होती. त्याच्यावर हुंड्यासाठी त्रास देण्याचाही गुन्हा दाखल आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी