शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

कॉल सेंटरप्रकरणी १० आरोपींना कोठडी, सूत्रधार फरार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 01:51 IST

Crime News : या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात होता. आरोपींना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील दोन मुख्य सूत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून ते फरार आहे.

नालासोपारा - पश्चिमेकडील श्रीप्रस्थमधील सुंदरम प्लाझा इमारतीमध्ये बॅसिन एक्सपोर्ट लि. नावाचे हे बोगस कॉल सेंटर २५ दिवसांपूर्वीच थाटले होते. या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून १० आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली होते. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घातला जात होता. आरोपींना गुरुवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील दोन मुख्य सूत्रधारांची नावे निष्पन्न झाली असून ते फरार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० आरोपी, फरार आरोपी जुबेर व प्रदीप यांनी आणि त्यांच्या अमेरिकेतील साथीदारांच्या मदतीने कटकारस्थान करून डार्क वेबवरून अमेरिकेतील नागरिकांचे एस.एस.एन. नंबर, मोबाइल क्रमांक इत्यादी गोपनीय माहिती चोरायचे. नंतर या कॉल सेंटरच्या ठिकाणी नेमलेले कर्मचारी आरोपी त्या माहितीच्या आधारे व बेकायदेशीर कॉल सेंटर चालवून व्ही.ओ.आय.पी. सर्व्हिसद्वारे अमेरिकन नागरिकांना कॉल करायचे. आरोपी कर्मचारी हे अमेरिकेतील सोशल सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन अधिकारी असल्याची बतावणी करून त्या अमेरिकन नागरिकांना गंभीर गुन्हा केल्याचे सांगायचे. दोषारोपपत्र दाखल होऊन तुम्हाला जेलमध्ये जावे लागणार, नोकरी जाणार, वाहन परवाना रद्द होणार, मालमत्ता जप्त होणार, सिक्युरिटीकार्ड काळ्या यादीत जाणार, असे इंग्रजीत सांगून भीती व दहशत निर्माण करून हजारो डॉलर रक्कम भरण्यास लावायचे.दोन्ही फरार आरोपींनी अमेरिकन साथीदारांसह नियोजितरीत्या कट रचून अमेरिकेतील नागरिकांना गुन्हा दाखल करण्याची व तडजोड न केल्यास अटकेच्या कारवाईची भीती दाखवून त्यांना कोणत्याही दुकानातून हजारो डॉलर किमतीचे गिफ्टकार्ड घेण्यास भाग पाडायचे. गिफ्टकार्डवरील १६ अंकी अकाउंट नंबर जमा करायला सांगायचे. अमेरिकेतील आरोपी साथीदारांच्या बँक खात्यात ती रक्कम लगेच ट्रान्सफर होते. जमा झालेल्या रकमेपैकी काही हिस्सा दहाही आरोपी व फरार आरोपींनी अयोग्य मार्फतीने भारतामध्ये स्वतः प्राप्त करून आर्थिक फायदा मिळविल्याचे दिसून आले आहे.  

अटकेतील आरोपींची नावेप्रकाश दीपक बॅनर्जी (३४), जयेश गोपाल पडाया (२४), चंदन यशवंत आमीन (२४), भरत नारायण भाटी (३०), ओमकार नितीन काळे (२०), सनीत सुभाष कपाडे (२०), कोमल तानाजी बघाडे (१९), मुस्कान वाजीद हुसेन (१९), प्रांजल पीयूष शिंदे (२८), चंद्रेश मनोहर विश्राम (२४) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार