आला उन्हाळा, स्वत:ला सांभाळा

By admin | Published: April 4, 2016 12:40 AM2016-04-04T00:40:16+5:302016-04-04T00:40:16+5:30

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळा आग ओकु लागला आहे. शहरवासीयांना आज सुपर हॉट संडे अनुभवयास आला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी उन्हाचा पारा ४१ पर्यंत चढला होता. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. २०१५ च्या एप्रिल महिन्याचे रेकॉर्ड यंदाच्या एप्रिलने तोडले असून आजचे तापमान ४२.५ वर जाण्याची शक्यता आहे.

Summer comes, take care of yourself | आला उन्हाळा, स्वत:ला सांभाळा

आला उन्हाळा, स्वत:ला सांभाळा

Next
वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळा आग ओकु लागला आहे. शहरवासीयांना आज सुपर हॉट संडे अनुभवयास आला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी उन्हाचा पारा ४१ पर्यंत चढला होता. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. २०१५ च्या एप्रिल महिन्याचे रेकॉर्ड यंदाच्या एप्रिलने तोडले असून आजचे तापमान ४२.५ वर जाण्याची शक्यता आहे.
वाढत्या तपमानामुळे जनजीवनावर परिणाम होऊन विस्कळीत झाले आहे. उन्हाच्या तळाख्याने जीवाची लाही लाही होत असल्याने प्रत्येकजण गारवाच्या शोधात आहे. त्यामुळे थंडपेय, टरबुज, खरबुजे, काकडी, फळे तसेच बर्फाच गोले, ऊसाचा रस, ज्युस, टोपी, स्कार्फ, रुमाल, कुलर आदी वस्तुंच्या मागणीत वाढ झाली आहे.
प्रत्येकजण उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी डोक्यावर टोपी, तोंडाला स्कार्फ, डोळ्यांवर चष्मा लावूनच बाहेर पडत आहे.

Web Title: Summer comes, take care of yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.