घोलप-गायकवाडचे यश

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:01+5:302017-01-23T20:13:01+5:30

अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी अश्विनी दिलीप घोलप हिने द्वितीय क्रमांक, तर हायस्कूलचा ओम लक्ष्मण गायकवाड याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल पी.एच. गायकवाड, ॲड. शंकरराव माने, प्राचार्य संपतराव काळे आदींनी त्यांचे कौतुक केले.

Success of Gholap-Gaikwad | घोलप-गायकवाडचे यश

घोलप-गायकवाडचे यश

Next
मदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील श्री. साईनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी अश्विनी दिलीप घोलप हिने द्वितीय क्रमांक, तर हायस्कूलचा ओम लक्ष्मण गायकवाड याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यांना ज्येष्ठ साहित्यिक लहु कानडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याबद्दल पी.एच. गायकवाड, ॲड. शंकरराव माने, प्राचार्य संपतराव काळे आदींनी त्यांचे कौतुक केले.
---------
शिवसेनेतर्फे कार्यक्रम
अहमदनगर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त नगर शहर शिवसेनेच्यावतीने सोमवारी (दि.२३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बसस्थानकाशेजारी असलेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रबोधन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप चितळे रोडवरील शिवसेना कार्यालयाजवळ होणार आहे. जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेसाठी २८ जानेवारीपर्यंत निबंध सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Success of Gholap-Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.