शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

कणक गोविंंद आश्रमशाळेला कुलूप धामणगाव : फर्निचर, स्वयंपाकाचे सामान पडून

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST

अकोले : तालुक्यातील धामणगाव पाट येथे सुरु झालेली राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळाची (तळोदा, जि. नंदूरबार) कणक गोविंद अनुसूचित जाती-जमाती निवासी आश्रमशाळा वादाच्या भोवर्‍यात अडकल्याने पाचच महिन्यांत बंद पडली. या भाड्याच्या इमारतीत आता फक्त फर्निचर व स्वयंपाकाचे सामान पडून आहे.

अकोले : तालुक्यातील धामणगाव पाट येथे सुरु झालेली राजमाता जिजाऊ शिक्षण मंडळाची (तळोदा, जि. नंदूरबार) कणक गोविंद अनुसूचित जाती-जमाती निवासी आश्रमशाळा वादाच्या भोवर्‍यात अडकल्याने पाचच महिन्यांत बंद पडली. या भाड्याच्या इमारतीत आता फक्त फर्निचर व स्वयंपाकाचे सामान पडून आहे.
आदिवासी ६७ विद्यार्थ्यांसह ही शाळा तळोदा येथून स्थलांतरित होत धामणगावला सुरू झाली होती. परंतु पाचच महिन्यांत शाळेला कुलूप लागल्याने संस्थेने या मुलांना आपापल्या घरी सोडले. ३० जून २०१४ ला या अनुदानित आश्रमशाळेच्या नोकरभरती दरम्यान गोंधळ झाला होता. संस्थाचालकास चोप देऊन त्याची स्कोडा गाडी फोडून गावातून पिटाळून लावले होते. राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी डॉ. तुकाराम पिचड यांनी आदिवासी विभागाची कोणतीच शाळा धामणगाव पाट येथे नाही, असा निर्वाळा दिला होता.
मोठ्या हलाखीत सुरु असलेली ही शाळा दिवाळीनंतर भरलीच नाही. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते. तसेच मुलांचीही फरपट सुरू होती. त्यामुळे शाळेला कुलूप लागले.
गावातील एका इमारतीला मोठ्या दिमाखात झळकत असलेले संस्थेचे फलकही आता गायब झाले आहे. इमारतीत फक्त फर्निचर व स्वयंपाकाची भांडी पडून आहेत. इमारत ओस पडली असून गावकरी शाळा सुरु होण्याची वाट पाहत आहेत.
-------------
या शाळेत गरीब पोरं होती. त्यांचं या शाळेने नुकसान केले. शाळा व्हती तवा गावात कलकलाट राहायचा. आता दुपारी सुनं गाव खायला उठतं.
- चौधरी बाबा, गावातील वृद्ध

--------
पोरांचे लई हाल होते, शिक्षक कोण? हे कधी कळालंच नाही. तीन महिन्यांत वर्गच कधी भरलेला आणि शिक्षक शिकवताना दिसला नाही. दिवाळीला गेलेली मुले परत आलीच नाही. शाळा बंद होतानाच्या शेवटच्या दिवसांत मुलांना खायला नव्हतं. मी तांदळाचा कट्टा देवून मुलांना स्वयंपाक करुन वाढला
- गावातील किराणा दुकानदार

सोबत फोटो