राहाता महाविद्यालयात १०४ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान
राहाता महाविद्यालयात १०४ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान
अस्तगाव : सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे युग असून, त्यात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची गरज आहे. केवळ पदवी मिळवणे हे आपले कर्तव्य नसून या पदवीचा उपयोग हा समाजासाठी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ॲड. रघुनाथ बोठे यांनी केले.
राहाता तालुक्यातील अस्तगाव माथा येथील शिर्डी साई रूरल इन्स्टट्यिूटच्या कला, विज्ञान, वाणिज्य व अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवीप्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कला महाविद्यालयातील ३१, तर अभियांत्रिकीच्या ७३ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यात आली.
यावेळी प्रा. डॉ. बी. के. सलालकर, प्रा. खर्डे यांच्यासह विलास कोते, प्रमोद गोंदकर, गाडेकर पाटील, चोळके पाटील, भगवानराव डांगे, प्रा. एस. सी. दंडवते, एस. के. पुलाटे, राजाराम वाघचौरे, तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
Web Title: Degree award to 104 students in Rahita College
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.