शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निसाका प्रशासकीय मंडळाने स्वीकारला पदभार

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक यांनी नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळातील प्राधिकृत अधिकार्‍यांनी अखेर रविवारी पदभार स्वीकारला आहे.

भाऊसाहेबनगर : निफाड सहकारी साखर कारखान्यावर प्रादेशिक सहसंचालक यांनी नियुक्त केलेल्या प्रशासकीय मंडळातील प्राधिकृत अधिकार्‍यांनी अखेर रविवारी पदभार स्वीकारला आहे.
निसाका मुख्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळातील शासकीय सदस्य जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले, निफाड तालुका उपनिबंधक महेश भडांगे यांच्यासह भागवत बाबा बोरस्ते, सुकदेव चौरे, सतीश मोरे, पूजा हरी काळे, संजय गामणे, कचरू राजोळे, सिंधूबाई खरात, लिलावती तासकर आदिंनी पदभार स्वीकारून कारखान्याची सूत्रे ताब्यात घेतली.
यापूर्वी प्रादेशिक सहसंचालकांनी शासकीय स्तरावरून निफाड सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष देसले व तालुका उपनिबंधक महेश भडांगे आदिंची नियुक्ती केली होती. परंतु सदरच्या आदेशाला निसाकाचे तत्कालिन अध्यक्ष भागवत बोरस्ते यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. त्यानंतर शासकीय स्तरावरून वरील तीन शासकीय अधिकार्‍यांसह आठ कारखाना सभासद मिळून अकरा सदस्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली. शासकीय अधिकारी न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशामुळे पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवित होते. बोरस्ते यांनी सदरची याचिका मागे घेतली होती. अखेर रविवारी सर्वच प्राधिकृत अधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला आहे.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक भागवत भंडारे, शेतकी अधिकारी अनिल पाटील, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मोगल, सरचिटणीस संपतराव कडलग संघटना प्रतिनिधी कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
रास्ता रोकोबाबत आज निर्णय
कारखान्याच्या प्रशासकीय मंडळातील शासकीय प्रतिनिधींची पदभार स्वीकारण्यासंबंधीची असमर्थता, कारखाना सहभागी तत्वावर चालविण्यास देणे, कामगारांचे २८ महिन्यांपासून थकलेले वेतन, कामगार वसाहतीत गेली २0 दिवसांपासून खंडित झालेला वीज व पाणीपुरवठा तसेच कारखाना गत दोन हंगामापासून बंद असल्याने ऊस उत्पादकांची झालेली वाईट अवस्था आदि कारणास्तव कामगारांचे वतीने मंगळवार दि. १0 रोजी निफाड सहकारी कारखान्याचे कामगार कुटुंबियांची कोकणगाव फाटा येथे रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट
प्रशासकीय मंडळातील शासकीय अधिकार्‍यांसह इतर प्राधिकृत अधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला असला तरी रास्ता रोको करायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय आज दि. ९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या द्वारसभेतच घेण्यात येईल.
संपतराव कडलग
सरचिटणीस निफाड साखर कामगार सभा