हुतात्मा एएसपी आकाशराव गिरिपुंजे यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली, पार्थिवाला खांदा देत दिला निरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:30 IST2025-06-10T18:29:50+5:302025-06-10T18:30:25+5:30

Chhattisgarh News: नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एएसपी आकाशराव गिरपुंजे यांना वीरमरण आले होते. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एएसपी आकाशराव गिरपुंजे यां श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या पार्थिवाला खांदा देत अंतिम निरोप दिला.

Chief Minister of Chhattisgarh Vishnu deo Sai pays tribute to martyred ASP Akashrao Giripunje, bids farewell by shouldering the body | हुतात्मा एएसपी आकाशराव गिरिपुंजे यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली, पार्थिवाला खांदा देत दिला निरोप  

हुतात्मा एएसपी आकाशराव गिरिपुंजे यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली, पार्थिवाला खांदा देत दिला निरोप  

नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एएसपी आकाशराव गिरपुंजे यांना वीरमरण आले होते. छत्तीसगडचेमुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी एएसपी आकाशराव गिरपुंजे यां श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या पार्थिवाला खांदा देत अंतिम निरोप दिला. मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी माना येथील चौथी वाहिनी छत्तीसगड सशस्त्र बल परिसरामध्ये उपस्थिक राहून हुतात्मा एएसपी आकाशराव गिरपुंजे यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले.

यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी हुतात्मा आकाशराव गिरपुंजे यांच्या शोकाकुल नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसेच कठीण प्रसंगात त्यांना धीर दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, हुतात्मा एएसपी आकाशराव गिरपुंजे यांनी आपल्या कर्तव्याप्रति अतुलनीय साहस, निष्ठा आणि समर्पणाचा परिचय देत सर्वोच्च बलिदान दिले आहे. आम्हाला त्यांच्या शौर्याप्रति अभिमान आहे. सरकार या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांसोबत उभं आहे.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय पुढे म्हणाले की, सुरक्षा दलांकडून सातत्याने होत असलेल्या यशस्वी कारवायांमुळे नक्षलवादी बिथरले आहेत. मात्र छत्तीसगड सरकार या आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. हुतात्मा श्री गिरपुंजे यांचं शौर्य आणि देशभक्ती सदैव आठवणीत राहील.

हुतात्मा आकाशराव गिरपुंजे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमण सिंह, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, उपमुख्यमंत्री अरुण साव, वनमंत्री केदार कश्यप, महिला आणि बालकल्याणमंत्री लक्ष्मी राजवाडे आणि इतर आमदार व सरकारी अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.  

Web Title: Chief Minister of Chhattisgarh Vishnu deo Sai pays tribute to martyred ASP Akashrao Giripunje, bids farewell by shouldering the body