शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

Shocking: "आई-बाबा मला माफ करा, मी चांगली मुलगी होऊ शकली नाही", चिठ्ठी लिहून मुलीचा आयुष्याचा शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:51 IST

Chhattisgarh Suicide: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

"आई-बाबा मला माफ करा, मी घेत असलेले पाऊल योग्य नाही. पण तरीही मी आत्महत्या करत आहे. मी एक चांगली मुलगी होऊ शकली नाही. माझ्या बहिणीची काळजी घ्या आणि तिची सर्व स्वप्ने पूर्ण करा..." अशी सुसाईड नोट लिहून एका १६ वर्षीय मुलीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. 

दुर्ग येथील मोहन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शंकर नगर भागात ही घटना घडली. निष्ठा गोस्वामी (वय, १६) असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता दहावीत शिकत होती. निष्ठाचे वडील अनिल गोस्वामी हे सरकारी वकील आहेत. तर, आई सरकारी शाळेत शिक्षिका आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे निष्ठा दुपारी अभ्यास करण्यासाठी आपल्या खोलीत गेली. मात्र, संध्याकाळ झाली तरी ती खोलीबाहेर आली नाही. घटनेच्या वेळी तिचे आई-वडील कामावर गेले होते आणि घरी केवळ तिची आजी होती. बराच वेळ होऊनही निष्ठाने दरवाजा उघडला नाही, तेव्हा आजीला संशय आला. आजीने तातडीने पालकांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी घरी येऊन दरवाजा तोडला असता, निष्ठाचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला.

या घटनेची माहिती मिळताच मोहन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना निष्ठाने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली असून, आपण चांगली मुलगी होऊ शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच आपल्या लहान बहिणीची काळजी घेण्याची विनंतीही तिने पालकांना केली आहे.

भिलाई येथील सेक्टर १० मधील शंकरा विद्यालयात शिकणारी निष्ठाने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, निष्ठाचा मोबाईल फोन जप्त केला आहे. मोबाईलच्या तांत्रिक तपासातून आणि कुटुंबीयांच्या चौकशीतून आत्महत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sixteen-year-old girl ends life, writing note apologizing to parents.

Web Summary : A 16-year-old girl in Chhattisgarh died by suicide, leaving a note expressing regret for not being a good daughter and asking her parents to care for her sister. Police are investigating the incident, which occurred in Durg district.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड