शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये राबविली जातेय शून्य कचरा क्षेत्र मोहीम

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

केज : येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील रस्ते शून्य कचरा क्षेत्र म्हणून ओळखण्याकरिता मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी शून्य कचरा क्षेत्र मोहीम हाती घेतली आहे.

केज : येथील नगर पंचायतीच्या हद्दीतील रस्ते शून्य कचरा क्षेत्र म्हणून ओळखण्याकरिता मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी शून्य कचरा क्षेत्र मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात होत असल्याने ठिकठिकाणचा कचरा साफ केला जात आहे.शून्य कचरा झोन साठी राज्य महामार्गावरील प्रतिभा नर्सिंग होम ते जयभवानी चौक आणि जयभवानी चौक ते जयभवानी मंदिर या मुख्य रस्त्याची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा कचरा शिल्लक राहणार नाही, याची कडेकोट दक्षता नगर परिषद मजूर घेत आहेत. या मोहिमेसाठी मुख्याधिकारी कोकरे यांनी कामाचे नियोजन करुन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पहाटे पाच वाजल्यापासून कामाला सुरुवात केली जात आहे. त्यामुळे हे काम लवकरच संपेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.चार दिवसानंतर ही मोहीम केज शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तीन अ‍ॅपे, दोन ट्रक आदी वाहनांचा समावेश आहे. तीन वाहने खरेदी करण्यात आली असून ही वाहने उपलब्ध होताच मोहिमेला वेग मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या मोहिमेत १६ कर्मचारी व मजूर यांचा समावेश आहे.मुख्याधिकारी कोकरे हे स्वत: तेथे थांबत असल्याने काम योग्य पध्दतीने सुरु आहे. या मोहिम दोन प्रकारे राबविण्यात येत आहे. यात ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करण्यात येत आहे. कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक गल्लीत घंटागाडी चालविली जात आहे. नागरिकांनी कचरा उघड्यावर टाकू नये, हा कचरा कचराकुंडीतच टाकावा, असे आवाहन नगराध्यक्षा श्रीमती शितल दांगट, मुख्याधिकारी कोकरे यांनी केले आहे.कचरा डेपोची जागा बदललीराज्य महामार्गावरुन केज शहरात बीडहून कचरा डेपोनेच स्वागत होते. शिवाय या परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोन शाळा आणि एक तंत्रनिकेतन महाविद्यालय असल्याने या कचरा डेपोचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्या प्रश्न लक्षात घेता हा डेपो बीड राज्य महामार्गाशेजारी गायरान जमिनीवरील खड्ड्यामध्ये सदिनकाच्या जागेत हलविण्यात आला आहे. (वार्ताहर)