युवकास डेंग्यूची लागण

By Admin | Updated: October 29, 2015 00:19 IST2015-10-28T23:56:16+5:302015-10-29T00:19:57+5:30

तुळजापूर : शहरातील लोहिया मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आले आहे.

Yuvakas infected with dengue | युवकास डेंग्यूची लागण

युवकास डेंग्यूची लागण


तुळजापूर : शहरातील लोहिया मंगल कार्यालय परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय युवकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून पुढे आले आहे. यापूर्वीही नवरात्रोत्सव कालावधीत बंदोबस्तासाठी आलेल्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाली होती. त्यामुळे पालिकने शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरात लोहिया मंगल कार्यालयानजीक राहणारे सागर सुधाकर मुळे (वय २१) हे तापिने त्रस्त असल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्त नमुन्यांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यापूर्वीही शारदीय नवरात्रोत्सव कालावधीत येथे बंदोबस्तासाठी आलेल्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. त्यांच्यावरही उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध ठिकाणाहून लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल झाले होते. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नगर परिषदेने शहरात तातडीने शहरात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Yuvakas infected with dengue