शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाची निर्घृण हत्या; हत्येपूर्वी मारेकऱ्यांनी केली होती लूटमार

By सुमित डोळे | Updated: April 30, 2026 18:56 IST

१५ हून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार पुन्हा गजाआड; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून, गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी भाजीमंडईतील देशी दारूच्या दुकानासमोर एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. किशोर रावसाहेब हिवाळे (२५, रा. राजनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, या हत्येच्या अवघ्या ३० मिनिटे आधी आरोपींनी एपीआय कॉर्नर परिसरात एका व्यापाऱ्याला खंडणी मागून लुटले होते.

वादाचे पर्यावसान हत्येतमयत किशोर हा मजुरीचे काम करायचा. गुरुवारी सकाळी मारेकरी शुभम बडे, दत्ता रोकडे आणि त्यांच्या एका साथीदाराने किशोरला दुचाकीवर बसवून मुकुंदवाडीत नेले. तेथे दारूच्या दुकानाबाहेर त्यांच्यात वाद झाला आणि त्याचे रूपांतर भीषण हत्येत झाले. तिघांनी किशोरवर चाकूने सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. गंभीर जखमी किशोर अर्धा तास तिथेच पडून होता, अखेर पोलिसांनी त्याला रुग्णालयात हलवले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

कुख्यात गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्याघटनेचे गांभीर्य ओळखून  सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर, गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, मुकुंदवाडीचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन कदम, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भरत पाचोळे, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, संतोष गायकवाड यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दत्ता रोकडे आणि शुभम बडे यांना अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले. मुख्य आरोपी दत्ता रोकडेवर यापूर्वी प्राणघातक हल्ला, लुटमार आणि चोरीचे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Daylight Murder in Chhatrapati Sambhajinagar: Youth Brutally Killed

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, a youth, Kishore Hiwale, was stabbed to death near a liquor shop. Before the murder, the accused robbed a businessman. Police arrested two suspects, including a notorious criminal with multiple prior offenses, within three hours of the incident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर