शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीच्या नगराध्यक्षपदी यासमीन बेगम

By admin | Updated: July 16, 2014 00:50 IST

कळमनुरी : येथील न.प.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या यासमीन बेगम फारुक बागवान तर उपनगराध्यक्षपदी राकाँचे म. नाजीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कळमनुरी : येथील न.प.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या यासमीन बेगम फारुक बागवान तर उपनगराध्यक्षपदी राकाँचे म. नाजीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांचे चार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेसच्या मुख्तारबी हमीदुल्ला पठाण, सेनेच्या गिरजाबाई बाबाराव खोडके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या यासमीन बेगम या एकमेव उमेदवार रिंगणात राहिल्या. संध्याकाळी ४.३० वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १७ न. प. सदस्यांपैकी १६ नगरसेवक हजर होते. तर सेनेच्या गिरजाबाई खोडके या अनुपस्थित होत्या. यासमीनबेगम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी पीठासन अधिकारी एम. बी. निलावाड यांनी बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर लागलीच उपनगराध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उपनगराध्यक्षपदासाठी राकाँचे म. नाजीम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची पीठासन अधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षपदी निवड घोषित केली. यावेळी तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, के.एम. विरकुंवर, माजी नगराध्यक्ष सादिया तबस्सूम, म. रफीक, उल्हास राठोड, डी. एन. बोलके, म. जाकेर, वाघ नदीम, एस. टी. काळे, सचिन वाघमारे, गजानन इंगळे व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पोनि रविकांत सोनवणे, फौजदार सय्यद मनिषा तायडे, स. अथर, राम वंजे, एन. एस. दीपके, एम. एच. पठाण, गजानन राठोड, असोले आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यानंतर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)