शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीच्या नगराध्यक्षपदी यासमीन बेगम

By admin | Updated: July 16, 2014 00:50 IST

कळमनुरी : येथील न.प.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या यासमीन बेगम फारुक बागवान तर उपनगराध्यक्षपदी राकाँचे म. नाजीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उस्मानाबाद : शारीरिक, मानसिक जाच करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासूस चार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा उस्मानाबाद येथील तदर्थ अतिरिक्त सत्र न्यायाधीश के़एस़होरे यांनी सुनावली़ विवाहितेने उमरगा चिवरी येथे १० आॅगस्ट २०१० रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती़
याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उळेगाव (ता़दक्षिण सोलापूर) येथील दत्तात्रय रामचंद्र घाटे यांची बहीण अनिता हिचा उमरगा चिवरी (ता़तुळजापूर) येथील महेश बबु्रवान कोळी याच्याशी २००८ मध्ये विवाह झाला होता़ विवाहानंतर अनिता हिचा पती महेश कोळी व सासू वत्सलाबाई कोळी हे तूला स्वयंपाक येत नाही, कर्ज फेडण्यासाठी वडिलांकडून ३० हजार रूपये घेऊन ये म्हणून शारीरिक, मानसिक जाच करीत होते़ याबाबत २०१० मध्ये महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार कण्यात आली होती़ त्यानंतर तिस नांदविण्यास नेण्यात आले होते़ मात्र, तरीही तिचा जाच सुरू होता़ या जाचास कंटाळून अनिता हिने १० आॅगस्ट २०१२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ याबाबत दत्तात्रय घाटे यांच्या फिर्यादीवरून अनिताच्या पतीसह सासूविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुरनं १३४/ १२ भादंवि कलम ४९८ अ, ३०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सहाय्यक पोलिस निरीक्षक एस़एस़शेटकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के़एस़होरे यांच्यासमोर सुनावणी झाली़ न्यायालयासमोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी़वाय़जाधव यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पती महेश कोळी व सासू वत्सलाबाई कोळी यांना कलम ४९८ अ सह ३४ भादंवि प्रमाणे दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रूपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरी, कमल ३०६ सह ३४ भादंवि अन्वये ४ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रूपये दंड, दंड न दिल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावल्याचे अ‍ॅड़जाधव यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)
प्रत्येकी दोन हजार रूपये दंडही.
१० आॅगस्ट २०१० मध्ये विवाहितेने गळफास घेऊन केली होती आत्महत्या.
नळदुर्ग पोलिस ठाण्यात झाला होता गुन्हा दाखल.