शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन पुलांची कामे अर्धवट अवस्थेत

By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST

सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत.

सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. ही कामे पुर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मोठ्या प्रमाणात रखडत पडल्याचे दिसत आहे. महत्वाच्या राज्य रस्त्यावरील पुलाची कामे तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत. मराठवाडा- विदर्भाला जोडणारा तालुक्यातील सेनगाव- कनेरगाव नाका रस्त्यावर पाच वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सवना गावाजवळ मराठवाडा विकास निधीतून दोन पुलाची कामे हाती घेतली होती; परंतु या दोन्ही कामांना निधी मिळाला नसल्याने संबंधित काम करणार्‍या एजन्सीने काम बंद केले. तब्बल पाच वर्ष काम रखडत पडल्याने दोन्ही पुलाच्या कामांना वाढीव दराने निधी मिळत नसल्याने एजन्सीने कामच सोडून दिल्याने पुलाच्या कामाची दैना झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही पुलाची रखडलेली कामे पुर्ण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु सा.बं. विभागाचे बोटचेपे धोरण व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष यामुळे कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. किमान विधानसभा निवडणुकीपुर्वी तरी पुलाचे काम पुर्ण करा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)सेनगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मोठ्या प्रमाणात रखडत पडल्याचे दिसत आहे सेनगाव-कनेरगाव नाका या महत्वाच्या राज्य रस्त्यावरील पुलाची कामे तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत मराठवाडा- विदर्भाला जोडणार्‍या सेनगाव- कनेरगाव नाका रस्त्यावर पाच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सवना गावाजवळ विकासनिधीतून दोन पुलाची कामे हाती घेतली होती साधारणत: पाच वर्षापूर्वी हाती घेण्यात आलेल्या दोन्ही कामांना निधी मिळाला नसल्याने संबंधित काम करणार्‍या एजन्सीने पुलाचे कामच बंद केले दरवर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही ती स्थिती राहण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशी करीत आहेत