शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
3
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
4
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
5
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
6
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
7
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
8
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
9
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
10
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
11
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
12
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
13
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
14
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
15
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
16
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
17
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
18
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
19
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
20
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या कामगारांची निदर्शने

By admin | Updated: May 28, 2014 00:26 IST

उस्मानाबाद : एस.टी.कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने २७ मे रोजी सुटीच्या वेळेत विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

उस्मानाबाद : एस.टी.कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने २७ मे रोजी सुटीच्या वेळेत विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वेतन करार २०१२ -२०१६ मधील रुपये १ हजार ५०० कोटी थकबाकीची रक्कम कामगारांना देण्यात यावी, १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा. कायदे, करार आणि परिपत्रकाचा भंग करुन देण्यात आलेल्या शिक्षा रद्द कराव्यात. एस.टी. चे उत्पन्न वाढविण्यासाठी संघटनेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वेतन करार मान्य करुनही अंमलबजावणी न झालेल्या बाबींची पूर्तता करावी. शासनाकडून देय असलेली १ हजार ८४० कोटीची रक्कम रा.प. महामंडळास रोखीने देण्यात यावी. अन्य राज्याप्रमाणे प्रवासी कर व वाहन करात सवलत देण्यात यावी, पथकरात सूट द्यावी, इतर राज्याप्रमाणे एस.टी. ला सक्षम करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. वारंवार पाठपुरावा करुनही शासन मागण्या गांभिर्याने घेत नाही, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. आंदोलनानंतर विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये स्थानिक पातळीवरील मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आंदोलनामध्ये विभागीय अध्यक्ष अग्निवेश शिंदे, विभागीय सचिव शरद राऊत यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतरही मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी) स्थानिक मागण्या २००९ मध्ये सेवेत रुजू झालेल्या यांत्रिकी व वाहक कर्मचार्‍यांच्या करारानंतरची वेतन निश्चिती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. ती दुरुस्त करण्यात यावी. विना तक्रार १० वर्षे सेवा झालेल्या वाहक कर्मचार्‍यांस रा.प. परिपत्रकाप्रमाणे एक वेतनवाढ देण्यात यावी. आंतर प्रादेशिक बदल्या झालेल्या सर्व प्रवर्गातील कर्मचार्‍यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे. ईटीआयएम मशीन अचानक बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने कारवाई करावी. आगारातील यांत्रिकी कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी लागणारी आवश्यक अवजारे, साहित्य तातडीने पुरवठा करण्यात यावे. महिला कर्मचार्‍यांना विश्रांतीपूर्व सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात.