शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराची मुलगी तालुक्यात प्रथम

By admin | Updated: June 18, 2014 01:40 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई मनात जिद्द असली की, यश हमखास मिळते. एका कामगाराच्या मुलीने परिस्थितीवर मात करून दहावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे.

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईमनात जिद्द आणि चिकाटी असली की, यश हमखास मिळते. एका कामगाराच्या मुलीने परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने अभ्यास करून दहावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकवला आहे. अंबाजोगाई येथे एका कपड्याच्या दुकानावर कामगार असलेले व केज तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी सोमनाथ विभुते यांची मुलगी शुभदा विभुते हिने दहावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभदाचा निकाल पाहून तिचे वडील सोमनाथ विभूते यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले अन् कंठ दाटून आला. सोमनाथ हे गतवर्षी पर्यंत गावीच म्हणजे केज तालुक्यातील भालगांव येथे रहात होते. मात्र शुभदा अभ्यासात हुशार असल्याने तिला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. यामुळे गाव सोडून अंबाजोगाई येथे यावे लागले. अंबाजोगाईला आल्यानंतर शुभदाच्या वडिलांनी एका कपड्याच्या दुकानावर नौकरी केली व दहा बाय दहा च्या एका पत्र्याच्या खोलीत राहून शुभदाला शिक्षणासाठी पैसे पुरविले. याची शुभदाला जाणीव होती. त्यामुळे तिने परिस्थितीवर मात करत मनातून दहावीचा अभ्यास केला. शुभदाचे वडिल दिवसभर राबराब राबायचे. शुभदाला शिकून मोठं करायचं, हे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचे आता शुभदाने ठरवले आहे. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. असे तिने ‘लोकमत’ ला सांगितले.