शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री रूग्णालयाचे काम अद्यापही अपूर्णच

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

उस्मानाबाद : महिला रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्त्री रूग्णालयाचे बांधकाम सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही सुरूच आहे़ पहिल्या टप्प्यातील इमारतीचे मुख्यमंत्री,

उस्मानाबाद : महिला रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्त्री रूग्णालयाचे बांधकाम सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही सुरूच आहे़ पहिल्या टप्प्यातील इमारतीचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते दोन वर्षापूर्वी उद्घाटन करण्यात आले होते़ मात्र, दोन वर्षानंतरही वाढीव टप्प्यातील काम पूर्ण न झाल्याने जिल्हा रुग्णालयात महिला रूग्णांची हेळसांड मात्र कायम आहे़उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे़ जिल्हा रूग्णालयात २६५ खाटांची सुविधा असताना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या ३०० च्याही वर जावू लागली आहे़ ही बाब लक्षात घेता उस्मानाबाद येथे महिला रूग्णांसाठी स्वतंत्र असे ६० खाटांचे स्त्री रूग्णालयास मंजुरी मिळाली होती़ प्रारंभी या कामास ५ कोटी २२ लाख २४ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ मात्र, रूग्णांची संख्या पाहता नंतरच्या टप्प्यात वाढीव ४० खाटांच्या बांधकामासाठी २ कोटी ५५ लाख ३७ लाख रूपयांचा निधी मिळाला होता़ १० डिसेंबर २०१२ रोजी पहिल्या टप्प्यातील ६० खाटांच्या इमारतीचे व निवासस्थानाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते़ पहिल्या टप्प्यात रूग्णालय इमारत व तीन व चार प्रकारचे निवासस्थानाचे काम पूर्ण झाल्यानंतर आॅक्टोबर २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले होते़ त्यानंतर मात्र, हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याचे दिसत नाही़ येथील एक व दोन प्रकारचे निवासस्थानाचे काम रखडले आहे़ वाढीव ४० खाटाच्या इमारतीचे काम २०१२ मध्ये सुरू करण्यात आले होते़ जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्याप किरकोळ काम रखडले आहे़ इमारतीतील दरवाजे, खिडक्या बसविण्यासह रंगरंगोटी करण्यात येत असल्याचेही सांगितले जाते़ मात्र, २००८ ते आजवरचा कालावधी पाहिला असता सहा वर्षाच्या कालावधीतही हे काम अद्याप पूर्ण झाल्याचे दिसत नाही़ जिल्हा रूग्णालयाकडून काही साहित्य या रूग्णालयात अणून टाकण्यात आले असले तरी इमारत वापरात नसल्याने हे साहित्यही कुलूपबंद अवस्थेत धूळखात पडले आहे़ वेळोवेळच्या अधिकाऱ्यांसह संबंधित विभागानेही इमारतीचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा केल्याचे दिसत नाही़ इमारतीचे काम रखडल्याने जिल्हा रूग्णालयातील अडचणींचा सामना करीत महिला रूग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)