जोर‘धार’चा पॅटर्न, पाऊस असा का वागतोय? सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:40 IST2025-10-06T16:39:10+5:302025-10-06T16:40:02+5:30
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

जोर‘धार’चा पॅटर्न, पाऊस असा का वागतोय? सप्टेंबरमध्ये जास्त बरसतोय
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात मागील काही वर्षांपासून वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. अनेक ठिकाणी तर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा बदललेला ट्रेंड हा खरीप हंगामासाठी घातक ठरतो आहे. हवामान खात्याच्या मते ३० सप्टेंबर हा पावसाळ्याचा शेवटचा दिवस असल्याचे जाहीर केले. यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्टऐवजी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
जिल्ह्यात किती?
जिल्ह्यात १४१ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद सप्टेंबर अखेरपर्यंत झाली.
सप्टेंबरमधली नोंद
सप्टेंबरमध्ये ३९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. २३३ मि.मी. अधिक हा पाऊस आहे.
जोर‘धार’चा पॅटर्न
मागील पाच वर्षांत दोन वर्षे वगळले तर तीन वर्षांत सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाला.
परतीचा पाऊस
परतीचा पाऊस खरीप हंगामातील पिकांची नासाडी करतो आहे. २ लाख ३७ हजार हेक्टरचे नुकसान जिल्ह्यात झाले.
कारणे काय?
बंगालच्या उपसागरात सलग कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यासह मराठवाड्यात जास्त पाऊस झाला.
जागतिक हवामान बदलाचा फटका?
जागतिक हवामान बदलाचा फटका पूर्णत: मान्सूनच्या पॅटर्नवर बसला आहे. त्यामुळे पावसाचे चक्र बदलल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस
तालुका...................झालेला पाऊस .......टक्के
छत्रपती संभाजीनगर... ७६७ मि.मी....... ११६ टक्के
पैठण... ९३७ मि.मी............ १६६ टक्के
गंगापूर...७२७ मि.मी............... १३६ टक्के
वैजापूर... ७३३ मि.मी............... १६६ टक्के
कन्नड... ९७० मि.मी............... १७१ टक्के
खुलताबाद...९१५ मि.मी.................. १३४ टक्के
सिल्लोड... ८४६ मि.मी................ १४९ टक्के
सोयगाव... ९४० मि.मी............. १३४ टक्के
फुलंब्री... ७२३ मि.मी...............१३२ टक्के
एकूण... ८२४ मि.मी.................. १४१ टक्के
चक्रीवादळाचा परिणाम
चक्रीवादळाचा परिणाम आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यांमुळे मराठवाड्यात पाऊस जास्त झाला.
- श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ
पॅटर्न बदलला
मान्सूनचा पॅटर्न बदलल्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस झाला आहे. तापमानवाढीमुळे हा सगळा प्रकार होतो आहे. यापुढे आणखी पाऊस पडेल.
- प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानतज्ज्ञ