शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील उद्योग लुटून गुजरातला कोणी नेले? उद्धव ठाकरे यांचा तिखट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 11:34 IST

छत्रपती संभाजीनगर नामकरण आम्ही केले, श्रेय ते घेताहेत: उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगर : ‘तुम्हाला मी महाराष्ट्र लुटू देत नव्हतो, म्हणून तुम्ही मला संपवायला निघाला आहात. माझी माणसं गद्दारी करून फोडली, महाराष्ट्रातील अनेक उद्योग लुटून गुजरातला कोणी नेले? ‘महाराष्ट्र लुटेंगे और दोस्तों को बाँटेंगे’ हीच खरी त्यांची नीती आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली.

शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी रात्री ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी मंचावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अशोक पटवर्धन, अनिल पटेल, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, मध्य मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब थोरात, पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे, पैठणचे उमेदवार दत्ता गोर्डे, कन्नडचे उमेदवार उदयसिंग राजपूत, फुलंब्रीचे उमेदवार विलास औताडे, वैजापूरचे उमेदवार दिनेश परदेशी, पूर्वचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार लहू शेवाळे आणि गंगापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.

ठाकरे म्हणाले की, कोविडकाळात शेवटच्या कॅबिनेटमध्ये आपण शहराचे नामकरण संभाजीनगर केले. मात्र मोदी याचे श्रेय मिंधेंना देत आहेत. असे असेल तर मग या लोकसभा मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे? शहरातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघाचे नाव औरंगाबाद कसे? असा सवाल त्यांनी केला. मोदी हे देशाचा कारभार सोडून महाराष्ट्र जिंकण्यासाठी पंतप्रधान म्हणून नव्हे तर भाजपचा स्टार प्रचारक म्हणून सभा घेत आहेत, यामुळे त्यांचीसुद्धा बॅग निवडणूक आयोगाने तपासली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

मुलांना मोफत शिक्षण देणारमागील दौऱ्यात एका शेतकरी महिलेने लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये मिळाल्याचे सांगताना मुलाच्या शाळेच्या फीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तेव्हा माझ्या तालुकाप्रमुखाने त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. ही परिस्थिती राज्यभर आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मुलांना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. सध्या सोयाबीन आणि कापसाला अत्यल्प भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नका, आपले सरकार आल्यावर सोयाबीनला सहा हजार रुपये हमीभाव देणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिम