शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोरगं दुरुस्त होईपर्यंत काय खावं बाबा..!

By admin | Updated: March 19, 2016 20:15 IST

वसमत : गावाकडे मजुरी मिळेना, जन्मजात असलेला नंदीबैलाचा धंदा चालेना, म्हणून इकडं आलो तर इथं हे वाढण समोर आले.

वसमत : गावाकडे मजुरी मिळेना, जन्मजात असलेला नंदीबैलाचा धंदा चालेना, म्हणून इकडं आलो तर इथं हे वाढण समोर आले. आता पोरगं दुरुस्त होईपर्यंत काय खावं, कुटुंब कसं चालवावं, असा आक्रोश वसमत येथील स्फोटातील जखमी मुलाच्या पित्याचा होता. मुलगा वाचला काही तरी पूर्वी जन्मीच पुण्य होत, असे म्हणत कधी दैवाला दूषणं देत तर कधी देवाचे आभार मानत तो पिता अश्रू ढाळत आहे. वसमत येथील बहिर्जीनगर भागात भंगार शोधत फिरणाऱ्या अंकुश नक्कलवार हा मुलगा स्फोटात गंभीररित्या भाजला गेला. त्याच्यावर वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तेथे त्याच्यासंगे सोयऱ्याची गर्दी आहे. घटना घडल्यापासून त्याच्या वडिलाच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. हट्टा येथील स्फोटात चार जण दगावल्याची खबर कानावर पडल्यापासून तर चिंता वाढली आहे. सदर प्रतिनिधीने उपजिल्हा रुग्णालयात जखमी मुलाचे वडील श्यामराव चेनबा नक्कलवार रा. मुदखेड, जि. नांदेड ह. मु. असेगाव रोड वसमत यांची भेट घेतली. अशा दिवसांत व मजुरी व्यवसाय नसलेल्या श्यामरावने त्यांचा मुलगा वाचला, हेच बरं झाले, असे म्हणत बोलणेच बंद केले. त्यास बोलते केले असता, पोराची माय दोन महिन्यांपूर्वी वारली. घरात सहा लेकरे आहेत. मूळचा व्यवसाय नंदी बैलाचा आहे. मात्र नंदीबैल सांभाळणे अवघड व धंदा त्याहीपेक्षा अवघड म्हणून आता फक्त नावच नंदीवाले राहिले आहे. मुदखेडला मजुरी मिळेना म्हणून कुटुंब वसमतला आणले. लहान लहान वस्तू विकणे, भंगार जमा करणे हा व्यवसाय करुन गुजरान करतो. आज ही घटना घडल्याने यापुढे मुलाला भंगारासाठी पाठवणार नाही. आता मुलगा दुरुस्त होईपर्यंत खाण्याचेही हाल होतील. शासनाची कोणतीच योजना, सुविधा आजवर आम्हाला मिळाली नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. सकाळपासून मोठ-मोठ्या अधिकारी मंडळीने दिलेल्या भेटी, काढलेले फोटो, झालेली गर्दी याने काहीतरी लाभ होईल. जीवनात प्रकाश येईल, अशी वेडी आशाही त्यांच्या बोलण्यातून जाणवली. या भटक्यांच्या पालापर्यंत ‘अन्नसुरक्षा’ पोहोचवणार कोण? हा खरा सवाल आहे. (वार्ताहर)वसममध्ये डब्याच्या स्फोटात युवक जखमी झाल्याची अपघात म्हणून नोंद मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी घेतली आहे. घटनास्थळावरील मातीचे नमुने, फुटलेल्या कॅनचे नमुने व त्यातील रसायनाचे नमुने फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणीसाठी सीलबंद केले आहेत, असे पोलिस निरीक्षक अशोक मैराळ म्हणाले. घटनेनंतर पोलिस अधीक्षक कैलास कणसे, डीवायएसपी पियुष जगताप, तहसीलदार सुरेखा नांदे व बॉम्बशोधक पथकानेही भेट दिली आहे.