शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी मनपाकडून चाचपणी !

By admin | Updated: November 25, 2014 00:57 IST

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे़



लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे़ पावसाळ्यातही पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरकरांना उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामोरे जावे लागणार आहे़ टंचाई कमी करण्यासाठी मनपा प्रशासन पाणीसाठ्यांची चाचपणी करीत आहे़ सोमवारी माजी मंत्री आ़ अमित देशमुख यांच्यासह मनपा पदाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणाची पाहणी केली आहे़ भविष्यात लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लिंबोटी किंवा उजनी येथून पाणी मिळू शकेल काय, याची चाचपणी केली जात आहे़
पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा मांजरा प्रकल्पात शिल्लक नसल्याने पर्यायी मार्गाचा शोध घेतला जात आहे़ मांजरा नदीवर असलेल्या बॅरेजसचे पाणी शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे़ एकंदरीत शहराची गरज लक्षात घेता पाणीटंचाई वाढणार हे लक्षात आल्यामुळे मनपा प्रशासन कामाला लागले आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील मन्याड प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणी योजना करण्यासाठी मनपाने ३५० कोटींचा आराखडा तयार केला आहे़ मात्र, सदरील प्रकल्पातून लातूरला पाणी आणता येईल की नाही, याबाबत निश्चितता नसल्याने उजनीच्या पर्यायावरही विचार केला जात आहे़ समुद्र सपाटीपासून लातूर शहर ६२४ मीटर उंच तर उर्ध्व मन्याड प्रकल्प ४३० मीटर उंचीवर आहे़ या प्रकल्पातून किती पाणी लातूरला मिळू शकते यावर चाचपणी केली जात आहे़ सोमवारी माजी मंत्री अमित देशमुख, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, गटनेते नरेंद्र अग्रवाल, रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे, अ‍ॅड़ दीपक सूळ, असगर पटेल, रविशंकर जाधव, राजेंद्र इंद्राळे, नवनाथ आल्टे, रवी सुडे, विष्णूपंत साठे, अहेमदखाँ पठाण यांच्यासह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)४
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठा अत्यल्प आहे़ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी पुरक पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहे़ त्यामुळे लिंबोटी व उजनी येथून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे़ महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून पुर्णत्वास आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती माजी मंत्री आ़ अमित देशमुख यांनी यांनी प्रकल्प पाणीनंतर अहमदपूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली़ यावेळी महापौर अख्तर शेख, आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माहिती दिली़ ४
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लातूर शहराचा पाणीपुरवठा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे आता पाणीपुरवठा मनपालाच करावा लागणार आहे़ त्यासाठी जलवाहिन्याची दुरूस्ती, आवश्यक तिथे जलवाहिनीचे नवे जाळे, पाणी गळती, वितरण व्यवस्था सक्षम करावी लागणार आहे़ अद्याप सदरील योजना एमजीपीकडे असली लवकरत तिचे हस्तांतरण होणार आहे़