शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

‘माकणी’त जेमतेम पाणीसाठा

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

उमरगा : शहरासह अन्य ५० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या माकणी धरणातील पाणी साठ्याच्या प्रमाणात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमालीची घट होत

उमरगा : शहरासह अन्य ५० गावांना पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या माकणी धरणातील पाणी साठ्याच्या प्रमाणात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमालीची घट होत असून, माकणी धरणात जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या टंचाईचे संकट नसले तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील माकणी धरणातून उमरगा शहरासह निलंगा, हसलगण जलशुद्धीकरण केंद्र, माकणी जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणार्‍या भूकंपग्रस्त ५२ गावांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणाच्या ८० कि.मी. डाव्या कालव्यावर ८ हजार ५३५ हेक्टर लागवडीचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. तर ८० कि.मी. च्या उजव्या कालव्यावर ६५३० हेक्टर लागवडीचे सिंचनक्षेत्र अवलंबून आहे. या दोन्ही कालव्याच्या पाण्यावर खरीपातील संकरित ज्चारी, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग खरीप भाजीपाला इत्यादी ५० टक्के राजकीय पिके घेतली जातात. गहू, ज्वारी, करडी, हरभरा, रबी भाजीपाला इत्यादी ७५ टक्के रबी पिके घेतली जातात. मागील दोन वर्षापासून या धरणात दोन्ही कालव्याद्वारे सोडण्याइतपत पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याने या कालव्याच्या पाण्यावर आधारीत असलेले सिंचनाचे क्षेत्र कोरडेठाक आहे. या धरणाची शीर्ष पातळी ६०८.१० मिटर असून, जलाशयाची पातळी ६०५.४० मीटर आहे. पूर्ण पातळी ६०.४ मीटर आहे. या धरणात १९ मे रोजी १७.७७७ दलघमि पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातील पाणीसाठ्यात कमालीच्या उकाड्यामुळे दिवसाकाठी ०.७ दलघमि पाण्याचे बाष्पीभवन होत असून, निलंगा, उमरगा, भूकंपग्रस्त ५२ गावे पाणीपुरवठा योजना २०० हेक्टर सिंचन क्षेत्र प्रतिमहा ३६ दलघमी पाण्याचा वापर होत आहे. उमरगा शहरासाठी प्रतिमहा १५ दलघमि तर निलंगा शहरासाठी ०६ दलघमि पाणी वापरण्यात येत आहे. सद्यस्थितीला या धरणात १ कोटी ७८ लाख घनमीटर तर १० अब्ज ७८ कोटी लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. येथून जवळच असलेल्या लोकमंगल कारखान्याचा पाणी पुरवठा कारखाना बंद असल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर) मागील दोन वर्षापासून पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने या धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नाही. असलेल्या पाण्याचा वापर उमरगा शहर पाणी पुरवठा योजना, निलंगा शहर पूरक पाणी पुरवठा योजना, माकणी व हसलगण जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत येणार्‍या भूकंपग्रस्त गावासाठी केला जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन सिंचन क्षेत्रासाठी होणारा वापर यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. या धरणात वरील गावांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी पुरेसे असून, धरणात एक वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असला तरी भविष्यातील संभाव्य पाणी टंचाईचा धोका लक्षात घेवून या धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले.