शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

भोकर : मागील वर्षी पाऊस जास्त झाला असला तरी यावर्षी उन्हाळ्यात २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ यापैकी एका गावात टँकरने तर उर्वरित २२ गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ मागील वर्षी भोकर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला़ यामुळे तालुक्यातील सुधा प्रकल्पासह सर्व लहान मोठे तलाव शंभर टक्के भरले़ दरवर्षी तालुक्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई भेडसावत होती़ पण यावर्षी एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईला सुरुवात झाली़ सध्या २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ यापैकी कामनगाव येथे टँकरने पणीपुरवठा सुरू करण्यात आला असून जगराम तांडा, मसाईनगर, धावरी बु़, पांडुरणा, पाळी, सोनारी, गारगोटवाडी, चिंचाळा, कोळगाव खु़, विष्णूनगर, सोमठाणा, मसलगा, अम्रुनाईकतांडा, नसलापूर, किशननाईकतांडा, सावरगाव (माळ), जांभळी, कांडली, बल्लाळ, धावरी खु़, हाडोळी, दिवशी खु़ तांडा, नांदा खु़ तांडा येथील बोअर अथवा विहिरी अधिग्रहण करण्यात येत आहेत़ पावसाळा सुरू होण्यास आणखी कालावधी असल्याने पाणीटंचाईग्रस्त गावांत भर पडणार आहे़ अधिग्रहण केलेल्या गावांची संख्या २२ असून या गावांना विजेच्या लपंडावाचाही त्रास सहन करावा लागतो. रात्री-बेरात्री ग्रामस्थांना पाणी भरावे लागत आहे़ यामुळे शेतीच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे़ (वार्ताहर) ३५ वर्षांत तीन योजना ३५ वर्षांत तीन योजना राबवूनसुद्धा गारगोटवाडीच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची बातमी लोकमतमधून प्रसिद्ध होताच या गावात अधिग्रहण केलेल्या विहिरीवरून पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ यामुळे गावकर्‍यांना दिलासा मिळाला असून यात महत्त्वाची भूमिका तहसीलदार महेश परांडेकर यांनी निभावली़