टंचाई निवारणासाठी पाणी साठवा अभियान

By Admin | Updated: June 15, 2014 00:56 IST2014-06-15T00:04:03+5:302014-06-15T00:56:51+5:30

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ पाणीटंचाईमुळे कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने अनोखी मोहीम सुरू केली

Water Saving Campaign for Drought Reduction | टंचाई निवारणासाठी पाणी साठवा अभियान

टंचाई निवारणासाठी पाणी साठवा अभियान

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ
पाणीटंचाईमुळे कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने अनोखी मोहीम सुरू केली असून, पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने ‘पान साठवा-गाव वाचवा’ हे अभियान सुर करण्यात आले आहे़ या अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट पाणी साठवण करून जमिनीत मुरविणाऱ्या ग्रामपंचायतीस रोख पुरस्काराबरोबरच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे़
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून अनेक हंगामी योजना राबविण्यात येतात़ अधिग्रहण करून लोकांची सोय केली जाते़ यासाठी लाखो रूपयांचा खर्चही होतो़ म्हणून शासनाने आता पावसाळा सुरु होण्यापूर्वी अनोखी स्पर्धात्मक मोहीम सुरु केली आहे़ यासाठी ‘पाणी साठवा-गाव वाचवा’ हे अभियान सुरू करून पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला जावा यासाठी मे महिन्याच्या अखेरीस शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे़ पाणीपुरवठ्यासाठी योजनांचा समावेश यात राहणार आहे़
सदरील अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी सन २०१४-१५ या वर्षात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा, यासाठी सुचित केले आहे़ त्यामुळे शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी शुक्रवारी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांची बैठक घेऊन योजनेत सहभागी होण्यासाठी माहिती दिली आहे़ यावेळी विस्तार अधिकारी बालाजी पोतदार उपस्थित होते़
पाच महिन्याचा कालावधी़़़
या अभियानाचा कालावधी १५ आॅक्टोबरपर्यंत म्हणजे पाच महिने राहणार असून, या पाच महिन्याच्या कालावधीत जेवढा पाऊस होणार आहे़ त्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे़ यात पाणी पुरवठ्याच्या सर्व योजनांचा समावेश राहणार आहे़
४सदरील अभियान लोकसहभाग, वित्त आयोग विविध योजनांच्या निधींचा सहभाग याच्या माध्यमातून राबविले जाणार असल्याने तालुक्यातील सर्वच म्हणजे ४३ ग्रामपंचायती सक्रिय सहभागी होणार असल्याचे विस्तार अधिकारी पोतदार यांनी सांगितले़

Web Title: Water Saving Campaign for Drought Reduction