शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

३५ गावांना पाणीटंचाईच्या झळा तीव्र

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़

लातूर : पावसाळा सुरु होऊन आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाने बरसात केली नसल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़ सध्या जिल्ह्यातील ३५ गावे अधिग्रहणा प्रतिक्षेत आहेत़ ६ गावांना ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून लातूर आणि अहमदपूर या दोन तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी जाणवत असली तरी उन्हाच्या चटक्यांनी अबालवृध्द होरपळून निघाले आहेत़ त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांस पावसाची प्रतिक्षा लागली आहे़ शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातील शेतीची कामे आटोपली आहेत़ मृग नक्षत्र निघून आठवडाभराचा कालावधी उलटला आहे़ परंतु, अद्यापही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे पहावयास मिळत आहे़ तीव्र उन्हामुळे जलस्त्रोतही आटत असल्याने दिवसेंदिवस पाण्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत़ जिल्ह्यातील ७८ गावे आणि ९ वाड्यांना १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्याचबरोबर ५ गावे आणि एका वाडीस ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे़ तीव्र उन्हामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे़ परिणामी अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ सध्या लातूर तालुक्यातील सारसा, रामेगाव तांडा, चिंचोली ब़, अहमदपूर तालुक्यातील परंचडा, देवकरा, उदगीर तालुक्यातील सोमला/ काहिमराम तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ चाकूर आणि देवणी या दोन तालुक्यांत मात्र अजूनही टँकर सुरू नसल्याचे दिसून येत आहे़ त्यापाठोपाठ जळकोटमध्येही पाणीटंचाई कमी जाणवत आहे़ जिल्ह्यातील ११६ गावे आणि ९ वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असली तरी त्यापैकी ११३ गावे आणि ९ वाड्यांनी प्रस्ताव सादर केला़ त्यातील ७८ गावाांचे आणि सर्व वाड्यांचे प्रस्ताव मंजूर करुन १०६ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.