शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊले चालती खड्ड्यातूनी वाट

By admin | Updated: June 25, 2014 01:03 IST

पाटोदा : तालुक्यातून तीन प्रमुख पालख्यांसह ११ दिंड्या पंढरपूरकडे जातात. या पालखी मार्गाची दुरवस्था झाल्याने पाऊले चालते खड्ड्यातूनी वाट असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे.

पाटोदा : तालुक्यातून तीन प्रमुख पालख्यांसह ११ दिंड्या पंढरपूरकडे जातात. या पालखी मार्गाची दुरवस्था झाल्याने पाऊले चालते खड्ड्यातूनी वाट असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. वारकऱ्यांचे वर्षानुवर्षे हाल होत असले तरी रस्ते दुरूस्तीकडे मात्र कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. पाटोदा तालुक्यातून पैठण येथील संत एकनाथ महाराज यांची पालखी, आपेगाव येथून ज्ञानेश्वरांची पालखी, भगवानगड येथून भगवान बाबांची यासह विविध ११ पेक्षा अधिक दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या पालख्या वर्षानुवर्षे जात असून दहा वर्षांपासून भगवानबाबांची पालखी सुरु करण्यात आलेली आहे. पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्यभरातील पालखी मार्ग सुधारण्याचे काम हाती घेतले होते. या अंतर्गत सर्व रस्त्यांना पालखी मार्ग म्हणून दुरूस्त करण्यात आले. पालखी मार्ग प्रशस्त असावा, वारकऱ्यांना चालताना अडचणी येऊ नयेत, अपघात होऊ नये तसेच वाहतूकही सुरळीत व्हावी यासाठी पालखी मार्ग प्रशस्त करण्यात आले. असे असले तरी पाटोदा तालुक्यातील पालखी मार्गांची मात्र कमालीची दुरवस्था झाली आहे. पाटोदा येथून जाणाऱ्या एक नाथांच्या व ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दोन मार्ग आहेत. यापैकी एकनाथांच्या पालखी मार्गाचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानंतर या मार्गाचा विकास करताना मूळ रस्ताच गायब करण्यात आला. पूर्वापार परंपरेनुसार नाथांची पालखी, मुंगसवाडा (ता. पाथर्डी) , राक्षसभुवन (ता. शिरूर), रायमोहा, तांबा राजुरी, पारगाव, डिघोळ, मोहरी मार्गे खर्डा आणि पुढे मार्गक्रमण करत असे. नव्याने ही पालखी शिरूर, राक्षसभुवन, रायमोहा, गारमाथा, तांबा राजुरी, पाटोदा, पारगाव, डिघोळ, खर्डा असे मार्गक्रमण करते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखीचा मूळ मार्गच बदलल्याने भाविकातून नाराजी व्यक्त होत आहे. पालखीसाठी शिरूर, राक्षसभुवन, किन्ही, चुंबळी हा रस्ता तयार झाला. या रस्त्याचीही आता बिकट अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. तसेच खडेही वर आले आहेत. यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना ठेचा लागतात तर पायांना खडेही रूततात. यामुळे भाविकांचे हाल होत असल्याने हा रस्ता डांबरीकरणाची मागणी भाविकातून होत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. तो ही मुळचा रस्ता बदलण्यात आला आहे. (वार्ताहर)पालखी मार्गांकडे होतेय दुर्लक्षपालखी रस्त्याचा सर्व्हे पूर्वी झालेला आहे. याबाबत आपणास सांगता येणार नाही. सध्या असलेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. तसेच पाटोदा ते अनपटवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरूस्ती केल्याचे उपअभियंता शेख जिलानी यांनी सांगितले.