शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा !

By admin | Updated: May 12, 2015 00:51 IST

लातूर : अवसायनात निघालेल्या लातुरातील ज्योती व इतर ७ यंत्रमाग सहकारी संस्थेतील कामगारांना संस्थेची मालमत्ता विकून वेतन देण्यात यावे

लातूर : अवसायनात निघालेल्या लातुरातील ज्योती व इतर ७ यंत्रमाग सहकारी संस्थेतील कामगारांना संस्थेची मालमत्ता विकून वेतन देण्यात यावे, असा निर्णय २२ वर्षांपूर्वी कामगार न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला असतानाही या निर्णयाची अंमलबजावणी नाही़ त्यामुळे गेल्या २२ वर्षांपासून हे कामगार उपासमारीचे जीवन जगत आहेत़ ४ ते ५ कोटी रुपयांचे वेतन थकीतच आहे़ दरम्यान, काही महिन्यांपूर्वी उपनिबंधकांनी जमीन विकण्याची परवानगी दिली आहे़ त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़लातुरातील ज्योती यंत्रमाग संस्थेअंतर्गत अन्य संस्थेतील एकूण दीड हजार कामगार कार्यरत होते़ संस्थेतील उत्पादन बंद झाल्याने ३१ मार्च १९९८ ला कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले होते़ दरम्यान १९९०-९१ मध्येच ही यंत्रमाग संस्था बंद पडली होती़ जाहीर प्रगटन देऊन कामगारांना कमी करण्यात आले़ त्यामुळे यातील ७० कामगारांनी न्यायालयात धाव घेऊन थकीत वेतनाची मागणी केली़ कामगार न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ३० मार्च १९९३ ला व ७ मे १९९९ ला ज्योती व इतर ७ पॉवरलूम सोसायटीकडून कामगारांच्या थकित वेतन देण्यासंदर्भात निकाल दिला़ २२ वर्षे उलटले तरी कामगारांना थकित वेतन मिळाले नाही़ यातील ७ ते ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे़ न्यायालयाच्या निकालानंतर कामगार प्रतिनिधी दिगंबर नरसिंग टोंपे यांनी ही लढाई सुरुच ठेवली आहे़ सदर सोसायटीची ६ एकर २० आर जमीन शिल्लक आहे़ ही जमीन विकून कामगारांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी आहे़ न्यायालयानेही कामगारांच्या बाजूने निकाल दिलेला आहे़ मात्र प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप कामगार प्रतिनिधी टोंपे यांनी केला आहे़ न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत कामगार आहेत़ दरम्यान, उपनिबंधकांनी संस्थेच्या जमीन विक्रीला काही महिन्यांपूर्वीच परवानगी दिली आहे़ त्यामुळे कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ थकीत वेतन मिळेल या आशेवर कामगार आहेत़ सोमवारी कामगार प्रतिनिधी टोंपे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी तहसीलदारांना निवेदन देऊन थकीत वेतनाची मागणी केली़ ज्योती व इतर ७ पॉवरलूम संस्थेकडून थकीत वेतनाची वसुली करुन संबंधीत कर्मचाऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालानंतर एकूण ९ वसुली प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत़ परंतु थकीत वेतन मिळालेच नाही़ वसुलीची कारवाईही झाली नाही़ तहसील कार्यालयाकडे सातत्याने विचारणा करण्यात येते़ परंतु, न्याय मिळत नसल्याचे कामगार प्रतिनिधी टोंपे यांनी सांगितले़ टोंपे यांचे १५ लाखाचे वेतन थकीत असून, सगळ्या कर्मचाऱ्याचे मिळून ४ ते ५ कोटींचे वेतन थकीत आहे़ (प्रतिनिधी)