शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख खड्ड्यांना प्रतीक्षा रोपांची

By admin | Updated: September 11, 2014 00:42 IST

रामेश्वर काकडे, नांदेड यंदा शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला विविध विभागामार्फत २६ लाख ५० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.

रामेश्वर काकडे, नांदेडयंदा शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला विविध विभागामार्फत २६ लाख ५० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरु असला तरी अद्यापही १७ लाख ८० हजार खड्ड्े रोपांच्या प्रतीक्षेत आहेत.या योजनेतंर्गत जिल्ह्याला २६ लाख ५५४२८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असले तरी १० सप्टेंबरपर्यंत केवळ २९५०५ रोपट्यांची लागवड झाली आहे. यामुळे यावर्षीही जिल्ह्यात शतकोटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. मागच्या आठवड्यापर्यंत रोपवाटिकेमध्ये जवळपास २१ लाख रोपटे तयार झालेली आहेत. वाढते प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी या योजनेअंतर्गत शासनामार्फत कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद आदी वेगवेगळ््या विभागामार्फत वृक्षलागवड करण्यात येते. आजपर्यंत जिल्हाभरात १८ लाख ९९५५ खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु पाऊस पडूनही लागवडीसाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्याने शतकोटी योजना बारगळली आहे. कृषी विभागाला ४ लाख ११३५८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून जवळपास १ लाख ४०२६७ खड्डे खोदले आहेत. तर २७६२१ रोपांची लागवड केलेली आहे.वनविभागाला ११ लाख ८१३३७ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. तर १२ लाख ३३००२ खड्डे खोदण्यात आले आहेत. तर जिल्हा परिषदेला १० लाख ७८३९२ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून १ लाख २४४०७ खड्डे खोदण्यात आले आहेत. तसेच सामाजिक वनीकरण विभागामार्फत २ लाख ७५०० रोपट्यांची लागवड करण्यात येणार असून १ लाख ८२३०० खड्डे खोदण्यात आले आहेत. जिल्ह्याला २६ लाख ५५४२८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून २२ रोपवाटिकेमध्ये जवळपास २१ लाख रोपे तयार आहेत. मात्र पावसाअभावी लागवडीला ब्रेक लागला आहे. सध्याचे लागवडीचे चित्र पाहता यावर्षीही शतकोटी योजनेचा बोजवारा उडणार असल्याचेच दिसत आहे़