रविवारी मतदान, ४६ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: January 9, 2015 00:53 IST2015-01-09T00:44:03+5:302015-01-09T00:53:16+5:30

औरंगाबाद : छावणी परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी

Voting on Sunday, 46 candidates in the fray | रविवारी मतदान, ४६ उमेदवार रिंगणात

रविवारी मतदान, ४६ उमेदवार रिंगणात


औरंगाबाद : छावणी परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी प्रचाराची मुदत उद्या शुक्रवारी सायंकाळीच संपत आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे.
छावणी परिषदेसाठी ११ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यावेळी परिषदेच्या सात वॉर्डांमध्ये तब्बल ४६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पंधरा दिवसांपासून छावणीत प्रचाराची धूम सुरू आहे. सकाळ-संध्याकाळ पदयात्रा आणि बैठका घेतल्या जात आहेत. याशिवाय भोंग्यांचा गोंगाटही सुरू आहे. मात्र, आता जाहीर प्रचाराची मुदत संपत आली आहे. त्यामुळे प्रचाराचा धुराळा थांबणार आहे. प्रचाराची मुदत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. म्हणून सर्वच उमेदवार शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Voting on Sunday, 46 candidates in the fray