शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

काठोकाठ भरलेले विष्णूपुरी अंधारात

By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST

नांदेड : नांदेड शहर व परिसराची भिस्त असलेला विष्णूपुरी प्रकल्प गेल्या वर्षभरापासून अंधारातच आहे़

नांदेड : नांदेड शहर व परिसराची भिस्त असलेला विष्णूपुरी प्रकल्प गेल्या वर्षभरापासून अंधारातच आहे़ थकित २० कोटी व चालू ८० लाखांच्या वीजबिलापोटी वीज कंपनीने प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ त्यामुळे सध्यातरी, जनित्रावरच धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत़गतवर्षी विष्णूपुरी धरण शंभर टक्के भरलेले असताना वीज कंपनीने थकबाकीपोटी प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित केला होता़ यापूर्वी प्रकल्पावर ४७ कोटींची थकबाकी होती़ त्यातील ३३ कोटी रुपये शासनाने माफ केले़ परंतु उर्वरित २० कोटींची थकबाकी भरणेही अवघड होवून बसले होते़ त्यामुळे त्यावरील व्याजाचा आकडा वाढतच गेला़ तर दुसरीकडे मागील वर्षीची ८० लाखांची थकबाकी हा विषयही अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत होता़ या प्रकारामुळे वीज कंपनीने वीजपुरवठाच खंडित करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे धरण भरल्यावर दरवाजे कसे उघडावेत असा प्रश्न निर्माण झाला होता़ त्यानंतर जनित्राच्या सहाय्यानेच गतवर्षी प्रकल्पाचे दरवाजे उघडणे आणि बंद करण्यात आले़ त्यानंतर गेली वर्षभर हा प्रकल्प अंधारातच आहे़ यंदाही धरण १०० टक्के भरले आहे़ परंतु वीजजोडणीच नाही़ त्यामुळे बुधवारी जनित्राच्या सहाय्यानेच प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला़ जनित्रासाठीही मोठ्या प्रमाणात डिझेल खर्ची पडत आहे़ त्यात प्रकल्पात पाणीसाठा वाढला अन् धरणाचे आणखी काही दरवाजे उघडण्याची वेळ आल्यास मात्र अडचण होणार आहे़ तर दुसरीकडे प्रकल्पावर रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत़ या ठिकाणी त्यांना उघड्यावर झोपावे लागत असून पाणी जवळच असल्यामुळे विषारी साप आणि इतर प्राण्यांचाही येथे मुक्त संचार असतो़ त्यामुळे जीव मुठीत घेवून या कर्मचाऱ्यांना इथे दिवस काढावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)