तब्बल चार वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले

By संतोष हिरेमठ | Updated: September 3, 2024 19:10 IST2024-09-03T19:09:50+5:302024-09-03T19:10:09+5:30

छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काठोळे यांची नियुक्ती 

Vijay Kathole appointed as Chhatrapati Sambhajinagar Regional Transport Officer | तब्बल चार वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले

तब्बल चार वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काठोळे यांची बदली करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांची  जूनमध्ये नागपूर (ग्रामीण) प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली.

जवळपास दीड वर्षे त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही कार्यालयाची जबाबदारी सांभाळली. अवघ्या दोन महिन्यांत त्यांची नागपूरहून छत्रपती संभाजीनगरच्या आरटीओ कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर आरटीओ कार्यालयाला पूर्णवेळ आरटीओ अधिकारी मिळाली आहे.

Web Title: Vijay Kathole appointed as Chhatrapati Sambhajinagar Regional Transport Officer