शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘दक्षता समित्यांच्या बैठका नियमितपणे घेण्यात याव्यात’

By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST

जालना : पुरवठा विभागाशी संबंधित ग्रामदक्षता समित्या, तालुका दक्षता समित्यांच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आज येथे दिले.

जालना : पुरवठा विभागाशी संबंधित ग्रामदक्षता समित्या, तालुका दक्षता समित्यांच्या बैठका नियमित घेण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी आज येथे दिले.जिल्हा दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी नायक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक डॉ.अशोक खरात, तहसीलदार जे.डी.दळवी, बालाजी क्षीरसागर, संदीप ढाकणे, विनोद गुंडमवार, छाया पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड आदी यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यातील अन्नधान्याची तपासणी दरमहा पाच तारखेच्या आत केली जाते. या अहवालावरून गोषवारा तयार करून त्याची प्रत दहा तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या. गोदामांची दुरूस्ती करण्याची गरज आहे, त्या संबंधीचे प्रस्ताव तहसीलदारांनी सादर करावेत, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.जिल्ह्यातील ज्या गावांच्या धान्य वितरणात अडचणी येत आहे, किंवा ग्रामस्थांना धान्य देणे सोयीचे नाही, अशा दुकानांच्या वितरणाबाबत काही बदल करावयाचे असल्यास तसा प्रस्ताव दाखल करण्यात यावा, तसेच काही ठिकाणी नवीन रास्त भाव दुकानांची गरज असल्यास तसेही प्रस्ताव दाखल करण्यात यावे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले. जी रास्त भाव दुकाने दुसरीकडे जोडली गेली असतील ज्यांना पाच एक वर्षे झाली असतील अशा दुकानांची शून्य ते पाच वर्षातील दुकानांची यादी तयार करून पाठवावी, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.या बैठकीत किरकोळ कोरोसीन विक्री, हॉकर्सद्वारे केली जाणारी रॉकेल विक्री, एस.एम.सेवा, जिल्ह्यांतील गोदामांची स्थिती, नवीन गोदामांची मागणी, रेशन कार्डचे वितरण आदी विषयावर चर्चा झाली.या बैठकीनंतर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकही झाली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी नायक यांच्यासह डॉ. डी. डी. भगत, यू.आर.घाडगे, आनंद कुलकर्णी, सुधीर जायभाये आदी उपस्थित होते.