शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:50 IST

अध्यक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यामुळे ते सध्या मुंबईऐवजी फुलंब्री मतदारसंघात जनसंपर्कात अडकलेले आहेत.

ठळक मुद्देधावपळीत जाधवांचा राजीनामा पक्षप्रवेश सोहळ्याची लगीनघाई

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजपामध्ये सध्या पक्षांतर करून येणाऱ्यांची भरती जोरदार सुरू आहे. पक्षांतर करून युतीमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना विद्यमान आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्यामुळे त्यांना मुंबईऐवजी औरंगाबादेतील फुलंब्री तालुक्यात यावे लागले आहे. आणखी किती जणांचे राजीनामे धावपळीत मंजूर होतील, हे पक्षांतर करणारे जेव्हा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या द्वारी येतील, तेव्हाच स्पष्ट होईल. शुक्रवारी राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा फुलंब्री मतदारसंघातील कुंभेफळ या गावी येऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सोपविला. त्यांनी तो तातडीने मंजूर केला. राजीनाम्यानंतर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. 

बार्शीचे दिलीप सोपल, सिल्लोडचे अब्दुल सत्तार आणि शुक्रवारी रत्नागिरीतील जाधव या तिन्ही लोकप्रतिनिधींना औरंगाबादेत येऊन राजीनामा द्यावा लागला. लोकप्रतिनिधींना पक्षांतर करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा द्यावा लागतो. अध्यक्षही निवडणुकीच्या प्रचाराला लागल्यामुळे ते सध्या मुंबईऐवजी फुलंब्री मतदारसंघात जनसंपर्कात अडकलेले आहेत. त्यामुळे विशेष विमानाने, कारने पक्षप्रमुखांनी नेमलेल्या जबाबदार नेत्यांसह पक्षांतर करणारे लोकप्रतिनिधी मुंबईतून थेट फुलंब्रीत येत आहेत. काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या लोकप्रतिनिधींना अशी धावपळ व आटापिटा करावा लागला आहे. विशेष म्हणजे हे सगळे होत असताना विधानसभा अध्यक्षही जमेल त्या पद्धतीने प्रोटोकॉल मोडून धावपळ करीत संबंधित आमदारांचा राजीनामा मंजूर करीत आहेत. दिलीप सोपल यांचा राजीनामा धावपळीत मंजूर करण्यात आला, तसेच अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मुलाच्या हस्ते अध्यक्षांकडे पाठविण्यात आला, तोदेखील तातडीने मंजूर करण्यात आला.

विधानसभा अध्यक्षांची धावपळ शुक्रवारी भास्कर जाधव हे विशेष विमानाने औरंगाबादेत आले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, अनिल परब, आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे होते. विधानसभा अध्यक्षांना गाठण्यासाठी त्यांनी फुलंब्री मतदारसंघ गाठला. बागडे हे कुंभेफळ परिसरात होते. त्यांचा ताफा शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे येत असताना कुंभेफळचे रेल्वेफाटक बंद झाले. त्यामुळे बागडे यांनी दुचाकीवरून शेंद्रा परिसरातील एक कार्यालय गाठले. तेथे जाधव यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना रवाना केले. राजीनामा मंजुरीसाठी हा आटापिटा, धावपळ पहिल्यांदाच बघितल्याची भावना कुंभेफळ परिसरात होती.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाMLAआमदारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस