Video : 'आरे मी मुंडेसाहेबांची लेक आहे', पंकजा मुंडेंची 'मनसे' मिमिक्री व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:21 IST2019-05-03T17:20:30+5:302019-05-03T17:21:08+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे यांची एक वेगळीच ओळख आहे.

Video: 'Aare me is the daughter of Mundesaheb', Pankaja Munde's 'MNS' Mimicry Viral video | Video : 'आरे मी मुंडेसाहेबांची लेक आहे', पंकजा मुंडेंची 'मनसे' मिमिक्री व्हायरल

Video : 'आरे मी मुंडेसाहेबांची लेक आहे', पंकजा मुंडेंची 'मनसे' मिमिक्री व्हायरल

औरंगाबाद - सुमित खांबेकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्यांच्या कन्येचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्यांच्या मुलीने पंकजा मुंडेंची मेमिक्री केली आहे. अक्षरा असे या मुलीचे नाव असून तिने केलेली पंकजा यांची नक्कल अनेकांना भावली आहे. सुमित खांबेकर हे औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष असल्याचे त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर म्हटले आहे. पंकजा यांनी वडिलांच्या मृत्युबाबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्याचा हा मिमिक्री व्हिडीओ आहे.  

महाराष्ट्राच्या राजकारणात पंकजा मुंडे यांची एक वेगळीच ओळख आहे. आपल्या अप्रतिम भाषण शैली आणि कणखर स्वभावामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. मात्र, पंकजा मुंडेंची नक्कल करणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर नेटीझन्सला आवडला आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडेची नक्कल करणारी मुलगी मनसे औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी कन्या आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आस्था जनविकास आयोजित उन्हाळी शिबिरात अक्षराने पंकजा यांचा रोल केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अक्षराचा हा रोल आपणास कसा वाटला? तेही आपल्या प्रतिक्रियेतून कळविण्याचे आवाहन सुमित यांनी केले होते. त्यांच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी अक्षराचे कौतक केले आहे. तसेच, अक्षराने हुबेहुब पंकजा मुंडेंची मिमिक्री केल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे.  

पाहा व्हिडीओ -

Web Title: Video: 'Aare me is the daughter of Mundesaheb', Pankaja Munde's 'MNS' Mimicry Viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.