मंठ्यात अज्ञात व्यक्तींकडून वाहनाची जाळपोळ

By Admin | Updated: September 4, 2015 00:25 IST2015-09-04T00:25:19+5:302015-09-04T00:25:19+5:30

जालना : मंठा शहरातील जवाहर कॉलनी येथील देवी रोडवरील रहिवासी फईम अन्सारी यांच्या घरासमोरील दुचाकी तसेच परिसरातील दोन हातगाड्यांना अज्ञात व्यक्तीने

Vehicle arson by unknown persons | मंठ्यात अज्ञात व्यक्तींकडून वाहनाची जाळपोळ

मंठ्यात अज्ञात व्यक्तींकडून वाहनाची जाळपोळ

 

जालना : मंठा शहरातील जवाहर कॉलनी येथील देवी रोडवरील रहिवासी फईम अन्सारी यांच्या घरासमोरील दुचाकी तसेच परिसरातील दोन हातगाड्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याची घटना बुधवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. फईम अन्सारी हे बुधवारी रात्री जेवन करून झोपले असता मध्यरात्री आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांच्या घरासमोरील मोटारसायकल कुणीतरी पेटवून दिली होती. गल्लीत उभ्या केलेल्या दोन मजुरांचे हातगाडेही जाळण्यात आले. परिसरातील रहिवाशांनी आग विझवून याबाबत मंठा पोलिसांना माहिती दिली. या आगीत अन्सारी यांची मोटारसायकल तसेच घराचे पडदे, शेजारील मजुरांचे दोन हातगाडे असे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. फईम अन्सारी वहीद अन्सारी यांच्या तक्रारी वरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Vehicle arson by unknown persons