शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावच्या बाजारात भाजीपाला कडाडला

By admin | Updated: July 1, 2014 01:01 IST

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत.

सादोळा: मान्सूनचा पाऊस लांबल्याचा परिणाम आता प्रत्येक गोष्टीवर जाणवू लागला आहे. माजलगावच्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांचे भाव कडाडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.माजलगाव तालुका दोन धरणांच्या लाभक्षेत्रात येतो. मात्र अल्प पर्जन्याने दोन्ही धरणे कोरडी राहिल्याने सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिरी, बोअर आटल्याने भाजीपाल्याचे उत्पादनही घटले आहे. परिणामी या पाऊस नसल्यामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने बाजारात भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे.अकोला, हिंगोलीहून कोथिंबिरीची आवकमाजलगावच्या आठवडी बाजारात येणारी कोथिंबीर ही अकोला आणि हिंगोली जिल्ह्यातून येत आहे. प्रत्येक आठवडी बाजारात तब्बल ५ ते १० क्विंटल कोथिंबीर या दोन जिल्ह्यातून येत आहे. भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजी विक्रेते रामभाऊ धुमाळ यांनी सांगितले.महागाईने जीव मेटाकुटीला आला असून, आता भाजीपाल्यानेही कहर केला आहे. यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा हाच प्रश्न पडला असल्याचे पूनम काळे, रंजना नाटकर या गृहिणींनी सांगितले. सध्या बाजारात मेथी १५ ते २० रु. जुडी, कोथिंबीर ५० ते ६० रु. जुडी, पालक १० ते २०, शेपू ३० ते ४०, सिमला मिरची १५० ते १८० रु. किलो, भोपळा १५० ते १६० रु. किलो, भेंडी ९० ते १०० रु. किलो भावाने विकत घ्यावी लागत आहे. या भाज्यांसह माजलगावच्या बाजारात इतर भाज्यांचे भाव १० ते २० टक्क्याने कडाडले आहेत. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)