शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

वासुदेव समाजाचा मेळावा

By admin | Updated: December 31, 2015 13:35 IST

सुदेव समाजसेवा संघाच्या वतीने मारवाडी धर्मशाळेत पहिला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांनी केले.

 नांदेड : वासुदेव समाजसेवा संघाच्या वतीने मारवाडी धर्मशाळेत पहिला राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. उद्घाटन महापौर शैलजा स्वामी यांनी केले. माजी सभापती किशोर स्वामी, प्रकाश मुथा, आनंद चव्हाण, प्रा. संतोष देवराये, प्रकाश कांबळे यांची उपस्थिती होती.शैलजा स्वामी म्हणाल्या, वासुदेव समाजाने प्राचीन रुढी, परंपरा, अंधश्रद्धेला बाजूला ठेवून आधुनिकतेची कास धरुन परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावे. सर्वच समाजांमध्ये उपवधू-वर यांना सुयोग्य जोडीदार मिळण्यासाठी परिचय मेळाव्याची नितांत गरज आहे. तरुण पिढीने रुपावर भाळून न जाता आचार, विचार, संस्कृतीमूल्ये याचा विचार करुन जोडीदार निवडावा. वासुदेव समाजाची ओळख भटका समाज असा असला तरी, प्रत्येक समाज पहाटेच्या प्रहरी जागण्यास हा समाजजागृती करणारा आहे. वासुदेव समाजासाठी मनपाच्या वतीने जागा देण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी सूचना केली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेवू असे आश्‍वासनही त्यांनी दिले. प्रा. संतोष देवराये म्हणाले, वासुदेव समाजाने आता बुसरलेल्या विचारांची कात टाकून शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होवून प्रगती करावी. तरुण पिढीने विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून यशाची उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. मेळाव्यात ४१ वधू व ५९ वरांनी परिचय करुन दिला. सूत्रसंचालन उत्तम वाकोडे व प्रकाश डोईजड यांनी केले. जिल्हाध्यक्ष रामकिशन डोईजड यांनी आभार मानले. मेळाव्याला एक हजार वासुदेवबांधव उपस्थित होते. /(प्रतिनिधी)