माँ जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:42+5:302021-01-13T04:10:42+5:30

रांगोळी स्पर्धा.. राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेब जन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती चौक, पुंडलिकनगर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. ...

Various programs on the occasion of Maa Jijau's birthday | माँ जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

माँ जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

रांगोळी स्पर्धा..

राष्ट्रमाता जिजाऊ माॅंसाहेब जन्मोत्सव समितीतर्फे छत्रपती चौक, पुंडलिकनगर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. समितीच्या संस्थापक अध्यक्ष संगीता विठ्ठलराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

शिवाजी हायस्कूल

शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एम. पवार यांच्या अध्यक्षतेखाली माँ जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. संदीप गव्हाणे, जे.एम. खान, एस.के. कदम, रवींद्र चिंचोले, डॉ. संदीप तुपे व बी.एस. मैद यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. श्रीमती एस.जी. बळी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पी.एस. राणे व के.यू.पाथ्रीकर यांनी केले. डी.के. डांगे व पी.बी. बैसाणे यांनी आभार मानले.

अनंत भालेराव विद्यामंदिर

या शाळेत जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. माध्यमिकच्या मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी यांच्या हस्ते जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शिक्षिका रोहिणी जोशी व विद्यार्थिनी रोहिणी तेजीनकर यांची यावेळी भाषणे झाली. सुधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालय

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयप्रकाश नारायण अध्यापक महाविद्यालयात माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. संदीप धिरडे होते. सोपान तौर हा विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत पहिला आला. डॉ.रचना अकोलकर, किरणकुमार वनवे, केतकी चौधरी, महेश मुळे, समर्थ रांजणीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Various programs on the occasion of Maa Jijau's birthday