शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘बिनविरोध’चा आज फैैसला

By admin | Updated: April 28, 2015 00:29 IST

उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी तुळजापूर येथे सोमवारी झालेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली़

उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी तुळजापूर येथे सोमवारी झालेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली़ यावेळी प्रमुख पक्षांनी जागांबाबतची मागणी एकमेकांसमोर ठेवली आहे़ यावर सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांत विचारमंथन सुरु असून, बिनविरोध निवडणूकीसंदर्भात मंगळवारी अंतीम फैसला होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे़विविध कारणामुळे मागील अनेक वर्षापासून उस्मानाबाद जिल्हा बँक कमालीच्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे़ याची झळ सर्वसामान्य शेतकरी सभासदांना सोसावी लागत आहे. त्यामुळेच जिल्हा बँक बिनविरोध काढून निवडणूकीच्या माध्यमातून होणारा बँकेचा खर्चही टाळावा अशी भूमिका ‘लोकमत’ने सातत्याने मांडली आहे. महत्वाचे म्हणजे सर्वपक्षियांनीही याबाबत सकारात्मक विचार करुन बँक बिनविरोध काढण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या अनुषंगाने रविवारी आयोजित बैठक झाली नाही़ त्यानंतर सोमवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली़ या बैठकीस आ़ राणाजगजितसिंह पाटील, आ़ मधुकरराव चव्हाण, आ़ बसवराज पाटील, आ़ राहूल मोटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ नितीन काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, माजी आ़ज्ञानेश्वर पाटील, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्यासह प्रमुख राजकीय नेतेमंडळींची उपस्थिती होती़ बैठकीमध्ये बँकेची सद्यस्थिती, भविष्यात बँकेला शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आदी विविध विषयावर चर्चा करण्यात आली़ सर्वपक्षीय पॅनल आल्यानंतर बँकेला निधी मिळण्यासाठी राज्य, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली़ शिवाय सर्वपक्षीयांनी १५ जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा अपेक्षित आहेत़ याची माहिती बैठकीत एकमेकांसमोर ठेवली आहे़ विशेष म्हणजे जागांची मागणी ठेवताना सद्याचे पक्षीय बलाबल, भविष्यात मिळणाऱ्या जागा यावर अडून न बसता एकमेकांनी लवचिक भूमिका घेण्याचे ठरले आहे. एकमेकांनी जागांबाबत अपेक्षित मागणी एकमेकांसमोर ठेवल्यानंतर मंगळवारी पुन्हा या विषयावर सर्वपक्षीयांची बैठक होणार असून, या बैठकीत बिनविरोध निवडणुकीचा अंतीम निर्णय होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्याच्या राजकारणात हे सर्वपक्षीय मंडळी राजकीय इतिहास घडविणार की पुन्हा एकमेकांविरोधात दंड थोपटून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार ? याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे़ (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या निवडणुकीत परंडा सोसायटी मतदार संघातून माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील यांचे सुपूत्र रणजित पाटील यांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते़ मात्र, सोमवारी रणजित पाटील यांचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले आहे़ त्यामुळे आता माजी आ़ ज्ञानेश्वर पाटील हेच ‘डीसीसी’च्या आखाड्यात उतरणार आहेत़ यापूर्वी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी दोन्ही अर्ज मागे घेतले आहेत़यापूर्वी विविध विषयावरून सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याचा प्रयत्न झाला़ मात्र, या बैठकीकडे कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली होती़ परंतु जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा करण्याच्या निमित्ताने का होईना जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्वपक्षीय नेतेमंडळी एका खोलीत चर्चेसाठी बसले होते़ या चर्चेतील निष्कर्ष हा ‘बिनविरोध निवडणूक’ असा निघाला तर ही जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे राजकीय तज्ज्ञांमधून बोलले जात आहे़पळवापळवीचा विषय थंड४जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी सर्वपक्षीयांची सकारात्मक भूमिका आहे़ त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत होणारी मतदार सभासदांची पळवापळवीचा विषय यंदा थंडच पडला आहे़ काहींनी मतदारांना अमिष दाखविण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी सर्वपक्षीयांच्या बैठका सुरूच असल्याने अनेकांचे लक्ष या बैठकांकडेच लागले आहे़जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी इच्छूक म्हणून २४७ जणांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत़ दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहेत़ तरी अद्यापही इतर कोणीही अर्ज काढण्यासाठी न फिरकल्याने २४४ नामनिर्देशनपत्र निवडणूक विभागाकडे आहेत़ सर्वपक्षीय नेतेमंडळींनी मंगळवारी बिनविरोधबाबत निर्णय घेणार आहेत़ त्यानंतर बुधवारी किती जण अर्ज मागे घेतात, किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, हे चित्र स्पष्ट होणार आहे़