शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सेनेतील संघटनात्मक बदल रखडल्याने बेचैनी

By admin | Updated: May 17, 2016 00:32 IST

विकास राऊत ल्ल औरंगाबाद शिवसेनेतील नवीन संघटनात्मक बदल रखडल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरील गटबाजीमुळे हा सगळा खेळ

विकास राऊत ल्ल औरंगाबादशिवसेनेतील नवीन संघटनात्मक बदल रखडल्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरील गटबाजीमुळे हा सगळा खेळ सुरू असल्यामुळे बैचेन कार्यकर्त्यांची मानसिकता सैरभैर झाली आहे. काही मतदारसंघांतील पदाधिकारी भाजपच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढण्यामागे संघटनात्मक बदल लांबल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री रामदास कदम, खा.चंद्रकांत खैरे असे दोन गट सध्या तरी पक्षात आहेत. महानगरप्रमुखपदाची प्रदीप जैस्वाल यांच्याकडे जबाबदारी असली तरी अलीकडच्या काळात संघटनेवर त्या पदाची फारशी पकड राहिलेली नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे पक्षाच्या कुठल्याही वादात पडू इच्छित नाहीत. तर दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे ग्रामीण तालुक्यांत अडकून आहेत. (पान २ वर)निर्णय लांबणीवरपक्षातील एका मुंबईतील पदाधिकाऱ्याने मध्यंतरी खा.खैरे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्या झालेल्या शब्दयुद्धावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते, पक्षात असे वाद होत असल्यामुळे फेरबदल केले तर जुने पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसमावेशक आणि सर्वांच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागेल. खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि पालकमंत्री यांच्यात एकमत होत नाही तोवर बदल होणे शक्य नाही, असेही त्या पदाधिकाऱ्याने सांगितले होते.